'उपमुख्यमंत्री अजित पवार खरंच बोलले, महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीचं चालवतंय'
कोल्हापुर उत्तरच्या निवडणुकांचे वारे सध्या वेगाने वाहत आहे. यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये टोलेबाजी आणि दावे प्रतिदावे पहायला मिळत आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 'उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) खरंच बोलले. महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीचं (NCP) चालवतंय. शिवसेना आणि काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांनी, आमदारांनी फक्त गाड्याचं फिरवायच्या', असा खोचक टोमणा पाटलांनी मारला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले, कोल्हापूर उत्तरसाठी (Kolhapur North) भाजपाच्या सत्यजित कदम (Satyjeet Kadam) यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदीच विराजमान झाले आहेत. त्यामुळे विकासाच्या कामावर सत्यजित कदम विजयी होतील. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिस यंत्रणेचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी होत आहे. कालही सांगलीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकर्पणात हे समजलं आहे. स्मारकाचं काम सांगली महापालिकेतील (Sangli) भाजप नगरसेवकांनी पूर्ण केलं आणि उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करून भाजपाला बोलवणार नाही अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता होती. मात्र काल तो लोकार्पण सोहळा पार पडला आहे. महाविकास आघाडीची अनेक बाबतीत दडपशाही सुरु आहे, असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात राजकीय टोलेबाजी पहायला मिळत आहे. देशाती पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारल्याने यानिमित्त त्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याची माहिती मिळत आहे. तर पालकमंत्री पाटील यांनीही जोरदार कंबल कसली असल्याने ही निवडणुक चुरशीची होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.