कोल्हापूर : मुंबई पालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला (shivsena) फायदा होईल, अशी विनंती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnait) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांना पत्र लिहून केल्याची चर्चा आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत आणि आपला पक्ष कमकुवत होत चालला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेले बरे होईल, असे पत्रात सरनाईक यांनी लिहिलं आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.
यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) मात्र त्यांच्यात शिस्तीचा अभाव असतो. भारतीय जनता पक्षामध्ये मी असेन किंवा मग माधव भंडारी असतील. कुणाला काय वाटतं हे जरी खरं असलं, तरी ते वाटणं आणि व्यवहारात आणण्याचं काम आम्हांला दिलेले नाही. ते अधिकार केंद्रीय मंत्री अमित शहा (amit shaha) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. nadda) यांच्याकडे आहेत. हेच वातावरण शिवसेनेमध्ये एकहाती आहे. तिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील ते फायनल असा नियम आहे. असा टोला पाटील यांनी लगावला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना कोरोनाचे नियम पाळत सुमारे पंधराशे ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, रोज घडणाऱ्या समाजातील विविध विषयांवर टिप्पणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे, तसाच तो संजय राऊत यांनाही आहे. यात समन्वय आहे का नाही? हे सामान्य माणूस ठरवतो. पटोले काय म्हणतात, प्रताप सरनाईक काय म्हणतात, सांगू नका म्हटंल तरी जे काही व्हायचं ते योग्य वेळीच होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.