Kolhapur : गावचं नाव बदलण्याऐवजी चंदगड तालुक्याचंच नाव बदललं; चूक लक्षात येताच प्रशासनानं काय केलं बघाच!

शासकीय दप्तरी डुक्करवाडीचे नाव बदलून ते रामपूर करणे गरजेचे होते.
Chandgad Taluka
Chandgad Talukaesakal
Updated on
Summary

तातडीने एनआयसीकडे ही चूक दुरुस्त करण्याबाबत सूचना करण्यात आली. त्यासाठी मोठा अवधी लागला.

चंदगड : तालुक्यातील डुक्करवाडी ग्रामपंचायतीच्या (Dukkarwadi Gram Panchayat) मागणीनुसार या गावचे नाव ‘रामपूर’ असे करण्यात आले. प्रशासकीय ऑन लाईन कॅटेगरीमध्ये या गावचे नाव बदलण्याऐवजी एनआयसीकडून तालुक्याचेच नाव बदलल्यामुळे सर्व ऑनलाईन कामकाज ठप्प झाले.

सायंकाळी चारच्या सुमारास ही चूक दुरुस्त करण्यात आली. मात्र, विविध कामांसाठी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया गेला. डुक्करवाडीचे नाव बदलून रामपूर असे करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार गॅझेटमध्ये नोंद करून ते महसूल प्रशासनाकडे पाठवण्यात आले.

Chandgad Taluka
Ambabai Temple : 'पितळी उंबरा ओलांडून घ्या आता कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन'; कधी मिळणार मंदिरात प्रवेश? जाणून घ्या अपडेट

त्यामुळे शासकीय दप्तरी डुक्करवाडीचे नाव बदलून ते रामपूर करणे गरजेचे होते. तशी मागणी प्रशासनाकडून एनआयसी विभागाकडे करण्यात आली. शुक्रवारी (ता. २५) त्यांनी हे नाव बदलले. मात्र, डुक्करवाडीचे नाव न बदलता तालुक्याचेच नाव ‘रामपूर’ असे करण्यात आले.

Chandgad Taluka
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

या दिवशी उशिरा हा प्रकार झाला. त्यानंतर शनिवार, रविवार सुटी असल्यामुळे कार्यालयीन कामकाज बंद होते. आज सकाळी विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना दाखले देण्याची वेळ आली, त्यावेळी ही चूक निदर्शनास आली.

तातडीने एनआयसीकडे ही चूक दुरुस्त करण्याबाबत सूचना करण्यात आली. त्यासाठी मोठा अवधी लागला. सायंकाळी चारच्या सुमारास ही चूक दुरुस्त करण्यात आली. मात्र, तालुक्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला. त्यांचा नाहक वेळ आणि पैसा खर्च झाला.

Chandgad Taluka
Health Tips : हिंदू धर्मात बाळाचे कान का टोचतात? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे

काय आहे एनआयसी..

एनआयसी हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, केंद्र शासनाच्या अंतर्गत येते. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी दुवा साधते. या विभागाने गेल्या तीन दशकांपासून देशातील ई गव्हर्नन्सचा वापर करण्याबाबत आघाडी घेतली आहे. उत्तम आणि पारदर्शी शासनासाठी मजबूत पाया तयार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.