कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची अंतिम प्रभागरचना गॅझेटसह प्रसिध्द करण्यात आली. सहा प्रभागांत बदल केल्याने बारा प्रभागांवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक एकहजार एकशे तेवीस मते भोसलेवाडी कदमवाडीतून (प्रभाग क्रमांक 8) कदमवाडीकडे (प्रभाग क्रमांक 9) वळविण्यात आली आहेत. 7939 मतदारसंख्येमुळे सर्वात मोठा प्रभाग राजलक्ष्मीनगर (प्रभाग क्रमांक 70) झाला आहे. तर सर्वात लहान प्रभाग शाहू कॉलेज (प्रभाग क्रमांक 10) बनला आहे. तिथे 3738 मतदारसंख्या आहे.
महाडिक वसाहत या नावात बदल करण्यात आला असून आता तो महाडिक वसाहत-पाटोळेवाडी या नावाने ओळखला जाईल.
कोल्हापूर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभागरचना 21 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारुप प्रभागरचनेवर 4 जानेवारीपर्यंत हरकती घेतल्या होत्या. त्यानंतर याबाबतची सुनावणीही झाली. आता अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून गॅझेटसह ती प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये कांही बदल करण्यात आले.
प्रभाग क्रमांक 8 कदमवाडी भोसलेवाडी हा अनुसूचित जातीसाठी आरक्षीत आहे. या प्रभागातील एक हजार एकशे तेवीस मते प्रभाग क्रमांक 9 कदमवाडी या सर्वसाधारण प्रभागाकडे वळविण्यात आली आहे. हा खुला प्रभाग असल्याने येथे चुरस वाढणार आहे.
प्रभाग क्रमांक 39 राजारामपूरी एक्सटेंशन या प्रभागात प्रभाग क्रमांक 64 शिवाजी विद्यापीठ येथील524 मते वाढविण्यात आली आहेत.भौगोलिक सलगतेचा विचार करता हा बदल झाला आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 31 बाजारगेट या हाय होल्टेज लढत असणाऱ्या प्रभागातील 478 मते प्रभाग क्रमांक 30 खोलखंडोबा या प्रभागात वळविण्यात आली आहेत.प्रभाग क्रमांक 23 रुईकर कॉलनी येथील 278 मते प्रभाग क्रमांक 16 शिवाजी पार्कमध्ये जोडली आहेत.प्रभाग क्रमांक 54 चंद्रेश्वरमधील 430 मते प्रभाक क्रमांक 55 पद्माराजे उद्यानात जोडली आहेत. प्रभाग क्रमांक 69 तपोवन मधील 622 मते प्रभाग क्रमांक 70 राजलक्ष्मीनगर येथे जोडली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून हा प्रभाग गणला जाणार आहे. या प्रभागाची मतदारसंख्या 7939 इतकी झाली आहे.
............
कोल्हापूर महापालिका निवडणूक
एकूण प्रभागसंख्या : 81
सर्वात मोठा प्रभाग 70 राजलक्ष्मीनगर मतदारसंख्या 7939
सर्वात लहान प्रभाग क्रमांक 10 शाहू कॉलेज : मतदारसंख्या 3738
महाडिक वसाहत प्रभाग झाला महाडिक वसाहत-पाटोळेवाडी
शिवाजी विद्यापीठ प्रभागातील 524 मते राजारामपूरी एक्सटेंशनमध्ये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.