CPR Hospital : जुनी दुखणी थांबणार कधी?

सीपीआर रुग्णालयातील बहुतांशी अनुभवी डॉक्टर आहेत, प्रभावी उपचार सेवा देण्यात त्यांचा हातखंडा आहे
kolhapur cpr hospital
kolhapur cpr hospitalsakal
Updated on

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयातील बहुतांशी अनुभवी डॉक्टर आहेत, प्रभावी उपचार सेवा देण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातून, परजिल्ह्यातून रुग्णांचा ओघ असतो. मात्र, गुणवत्तेला बाधा पोहचवणाऱ्या उणिवा बहुतेक ठिकाणी आहेत. या उणिवांची दुरुस्ती होणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

kolhapur cpr hospital
CPR Hospital : नियम अटीच्या फेऱ्यात डॉक्टर हवालदिल

रात्री-अपरात्री रुग्ण सीपीआरमध्ये आणला की निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली अपघात विभागात रुग्णांची नोंद होते. मात्र, रुग्ण गंभीर असेल, तर तो त्या आजाराचे लक्षण पाहून त्याला संबंधित विभागात डॉक्टरांशी बोलून ॲडमिट करावे लागते. येथून काही रुग्णांची हेळसांड सुरू होते. गंभीर रुग्णाला ॲडमिट कोठे करावे, यासाठी काही मोजके डॉक्टर तातडीने संमती देत नाहीत. काही वेळा डॉक्टरांचा संपर्कच होत नाही. अशा वेळी अपघात विभागात रुग्ण दोन ते सहा तास खोळंबून राहातो.

काही दिवसांपूर्वी मेडिसीनच्या डॉक्टरांनी एका गंभीर रुग्णावर उपचार करण्यास विलंब लावला. रुग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी अपघात विभागातील डॉक्टरांवर आरोप केले. या साऱ्यांत मेडिसीन विभागाचे डॉक्टर नामानिराळे राहिले. याप्रकरणाची चौकशी सुरू झाली. मात्र, चौकशी अहवाल तयार करण्यात चालढकल केली. यातही सर्वांना ‘क्लीन चिट’ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघात विभागांसह सीपीआर २६ विभागांत इंटरकॉम फोन सिस्टीम नाही. विभागातील डॉक्टरांना मोबाईलवर संपर्क साधावा लागतो. त्या डॉक्टरांची नेमकी ड्यूटी नसते. ड्यूटीवर दुसरेच डॉक्टर असतात. अशा बेभरवशी संपर्कात वेळ जातो. वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय बहुतांशी वेळा सायंकाळी सातनंतर बंद होते. रात्री-अपरात्री एकाद्या रुग्णाची हेळसांड होत असल्यास कोणत्या वरिष्ठ डॉक्टरांना कुठे, कसा संपर्क करावा, याची माहिती मिळत नाही.

kolhapur cpr hospital
CPR Hospital : प्रभावी उपचार; पण कोट्यवधी गमावले

योजनेची माहिती देणार कोण?

सीपीआरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना चालविली जाते. मात्र, या रुग्णांची लक्षणे पाहून त्याला योजनेचा लाभ मिळेल की नाही, हे सांगण्यासाठी सीपीआरचे डॉक्टर फारसे प्रयत्न करत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.