छत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रिटिश गव्हर्नर लेस्ली विल्सन यांचा पुतळा उभारला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा भाग म्हणून स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावर डांबर फेकून तो विद्रूप केला.
मालवणातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा सोमवारी कोसळला आणि एकूणच पुतळे व स्मारकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही प्रातिनिधिक पुतळ्यांची वैशिष्ट्ये, ही शिल्पे साकारताना ऊन-वारा-पाऊस या साऱ्या गोष्टींचा केलेला विविधांगी अभ्यास आणि त्यांचे जतन व संवर्धन अशा अनुषंगाने घेतलेला हा धांडोळा...