Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal

पाण्याच्या टाकीत पडून पावणेदोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; तैमूरचा वाढदिवस पुढच्या महिन्यात होता अन्..

Shahupuri Police Station Case : शाहरूख मुल्ला हे पत्नी व दोन मुलांसोबत मार्केट यार्ड परिसरातील एका सिमेंट कारखान्यात कामासाठी राहतात.
Published on
Summary

तैमूरचा वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात असल्याने त्याचीही चर्चा घरी झाली होती. इतक्यात रविवारी हा दुर्दैवी प्रकार घडला.

कोल्हापूर : मार्केट यार्डजवळील (Market Yard) लोणार वसाहत परिसरातील सिमेंट पाईप कारखान्यातील टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. तैमूर शाहरूख मुल्ला असे या पावणेदोन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात (Shahupuri Police Station) करण्यात आली.

मुल्ला कुटुंब मूळचे पट्टणकोडोलीचे आहे. शाहरूख मुल्ला हे पत्नी व दोन मुलांसोबत मार्केट यार्ड परिसरातील एका सिमेंट कारखान्यात कामासाठी राहतात. रविवारी कारखान्याला सुटी होती; पण शाहरूख मुल्ला हे खडी टाकण्याची किरकोळ कामे संपवित होते.

Kolhapur Crime
Sindhudurg Crime : 14 खलाशांना घेऊन जाणारी बोट निवती समुद्रात उलटली; दोन खलाशांचा बुडून दुर्दैवी अंत

याच आवारात खेळता खेळता तैमूर येथील पाण्याच्या टाकीत पडला. काही मिनिटांत हे त्याच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तैमूरला बाहेर काढून बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तैमूरच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Kolhapur Crime
Kolhapur : घरातून भूतपिशाच्च घालवतो सांगून कोल्हापुरात वृद्धाला 85 लाखांचा गंडा; भोंदू, बुवांवर विश्वास ठेवणे बनले धोकादायक

वाढदिवस महिन्यावर....

तैमूर हा त्याच्या मामाच्या गावी राहतो. कारखान्याला सुटी असल्याने वडिलांनी त्याला नुकताच घरी आणला होता. तो सोमवारी पुन्हा मामाच्या घरी जाणार होता. तसेच तैमूरचा वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात असल्याने त्याचीही चर्चा घरी झाली होती. इतक्यात रविवारी हा दुर्दैवी प्रकार घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.