Jyotiba Mandir : जोतिबा डोंगरावर आजपासून श्रावणषष्ठी यात्रा; उच्चांकी गर्दीची दाट शक्यता, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Jyotiba Mandir Kolhapur : श्रावणषष्ठी यात्रा पूर्ण क्षमतेने होत आहे. त्यामुळे या यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
Shravan Shashti Yatra
Shravan Shashti Yatraesakal
Updated on
Summary

रविवारी (ता. ११) सकाळी या यात्रेची सांगता होईल. आज सांयकाळपासूनच डोंगरावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

जोतिबा डोंगर : श्रीक्षेत्र जोतिबा मंदिरातील (Jyotiba Mandir) आदिमाया चोपडाई देवीची (Adimaya Chopdai Devi) श्रावणषष्ठी यात्रा (Shravan Shashti Yatra) आज (शनिवार) होत असून या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. घातपात, बॉम्बस्फोट, चेंगराचेंगरी या घटना घडू नयेत म्हणून, सर्व पथके, यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. श्रावणषष्ठी यात्रा पूर्ण क्षमतेने होत आहे. त्यामुळे या यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने श्रावण षष्ठी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.