ठोस निर्णय होत नसल्याने अखेर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अमर चव्हाण यांनीही कपड्यानिशी नदीत उडी मारली.
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीच्या प्रदूषणाचा (Hiranyakeshi River Pollution) प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करून जलसमर्पण आंदोलनातील १३ तरुण आंदोलकांनी नदीपात्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहातच उड्या मारल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना या आंदोलनाने घाम फोडला.