CM Eknath Shinde : इचलकरंजीला पाणी देण्यास शासन सकारात्मक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ः सुळकूडप्रश्नी मुंबईत चर्चा
cm eknath shinde says will provide water to ichalkarnaji for sure state govt politics
cm eknath shinde says will provide water to ichalkarnaji for sure state govt politicsSakal
Updated on

इचलकरंजी : इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. सर्वांच्या समन्यवयातून यातून मार्ग काढण्यात येणार आहे. या प्रश्नी राज्य शासन आपली जबाबदारी पूर्ण करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिले.

त्यांच्यासह दूधगंगा अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याबाबत शासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार आढावा घेऊन बैठक लावण्याबाबत जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सत्वर कळवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले

इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड पाणी योजनेबाबत वाद निर्माण झाल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. पण ही बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही.

cm eknath shinde says will provide water to ichalkarnaji for sure state govt politics
Kolhapur : ‘जेनेरिक’चे मोदींच्या हस्ते होणार उद्‌घाटन, पन्हाळा तालुक्यातील पोखले गावाला मिळाला मान

त्यामुळे रद्द झालेली ही बैठक पुन्हा व्हावी, यासाठी आज खासदार माने व चोपडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली. यावेळी दुधगंगा नळपाणी योजनेच्या प्रश्नाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. दूधगंगा धरणातील पिण्याच्या पाण्याचा राखीव साठ्यामधून इचलकरंजी शहरासाठी पाणी योजना मंजूर केली आहे. तथापि, धरणामध्ये असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या साठा उपलब्धतेबाबत काही मंडळींनी शंका उपस्थित केली आहे.

cm eknath shinde says will provide water to ichalkarnaji for sure state govt politics
Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा! मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून वाद

त्याचे निरसन करण्यासाठी शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागून घेतला आहे. अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रथम जलसंपदा मंत्री व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये पालकमंत्री व इतर सर्व संबंधितांना बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. त्यानंतर सर्वांच्या समन्वयातून पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.