Karnataka Election : CM एकनाथ शिंदे सीमाभागात प्रचाराला येणार? महत्वाची अपडेट आली समोर

भाजप आणि काँग्रेसचे (Congress) नेते समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी बेळगावात दाखल होत आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeEsakal
Updated on
Summary

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर शिंदे बेळगावला येणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती.

बेळगाव : भाजप व काँग्रेसचे नेते समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचारासाठी येत असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सीमाभागात प्रचाराला येणार नाही, असं स्पष्ट केल्यामुळं सीमाभागातील मराठी भाषिकांतून समाधान व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) विरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी (Maharashtra Leaders) सीमाभागात येऊ नये, अशी मागणी समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील विविध नेत्यांना पत्र पाठवून केली होती. तसेच समितीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आदींची भेट घेऊन समिती उमेदवारांबाबत माहिती दिली होती.

CM Eknath Shinde
Konkan Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेसाठी लवकरच होणार सर्व्हे; महाव्यवस्थापकांची माहिती

त्यामुळं महाराष्ट्रातील नेते प्रचारासाठी बेळगावला (Belgaum) येणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसचे (Congress) नेते समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी बेळगावात दाखल होत आहेत. त्याला विरोध होऊ लागला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींना कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला आहे.

CM Eknath Shinde
महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे 'उचापती' संघटना, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू; मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर शिंदे बेळगावला येणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाभागात प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळं शिंदे यांच्या भूमिकेचं समिती कार्यकर्त्यांतून स्वागत केलं जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे उडपी आणि मंगळूर इथं प्रचार सभा घेणार होते. शिंदे यांच्याप्रमाणं इतर नेत्यांनी सीमाभागात येणं टाळलं पाहिजे होतं, असं मत व्यक्त होत आहे.

CM Eknath Shinde
Political News : अजित पवारांमुळेच शिवसेनेचे आमदार फुटले; रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.