दरवर्षीच अशी स्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात आल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कोल्हापूर - महापुरामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी कऱण्यासाठी मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शिरोळ आणि कोल्हापूर शहरात शाहुपुरी, शिवाजी पूल याठिकाणी पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यंदाचं आस्मानी संकट हे भयानक असल्याचं म्हटलं. पुरामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचं मोठं नुसकसान झालं आहे. पावसाचं प्रमाण वाढलं आहे. वेधशाळा पावसाबद्दल इशारा देते तेव्हा नागरिकांचे नदीकाठच्या परिसरातून स्थलांतर केलं जातं. यावेळीही काही लाख नागरिकांचं स्थलांतर कऱण्यात आलं. अशा परिस्थितीत कोणतीही जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यावर ओढावलेलं यंदाचं आस्मानी संकट हे भयानक होतं, दरडीखाली लोक गाडले गेले. रस्ते वाहून गेले, खचले. या संकटातून बाहेर पडताना आपलं प्राधान्य जीव वाचवण्याला आहे. संकट आल्यानंतर ,पूर ओसरल्यानंतर कोरोना आणि पाण्यामुळे होणारे आजार पसरू नये याची दक्षता घेण्यात येत आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात दोन ते तीन जिल्ह्यात दौरे केले. पाहणी केल्यानंतर त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यामध्ये नागरिकांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. दरवर्षीच अशी स्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात आल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. पंचगंगा, सावित्री, जगबुडीचे पाणी वाढले की नदीकाठच्या लोकांना स्थलांतर करावे लागते. आता धरणातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचं नियोजन कसं करायचं ते पहावं लागेल. याशिवाय कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यासाठी भूगर्भाचा अभ्यास करून नियोजन करण्यात येईल असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
सततची पूरस्थिती आणि त्यामुळे करावं लागणारं स्थलांतर, होणारं नुकसान याबाबत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, या नागरिकांचे पूनर्वसन करणे गरजेचे आहे. दरवर्षी त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावते. या नागरिकांचे पूनर्वसन करण्यासाठी प्रसंगी सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. पाहणीनंतरचे अहवाल मागवण्यात आले आहेत. काही वेळा नागरिकांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तर त्यासाठी तयार रहा असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नदीपात्रात अतिक्रमण झालं असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. तसंच यापुढे अशा बांधकामांना परवानागी नाही. कारण यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात. पूररेषेच्या आतील अतिक्रमण हटवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील दुर्घटनाग्रस्त भागांचे दौरे केले. यावेळी पुराचं भीषण वास्तव पाहिलं. आता पूनर्वसनाच्या कामाला युद्धपातळीवर सुरवात करू अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना नदीला भिंत बांधण्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, यावर मतमतांतरे होणार असतील तर विचार करू. मला भिंत बांधायचीच आहे असं काही नाही, विसर्ग केला की पाणी घुसतं त्याचं काय करायचं काही संकटं आली की समिती नेमली जाते. त्याचा अहवाल आला की बासनात गुंडाळून ठेवतो. आता अहवालाऐवजी ठळक मुद्दे काढा त्यावर कार्यवाही करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.