इंधनरपुरवठा अत्यावश्यक सेवेसाठीच :जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई
petrol diesel
petrol dieselsakal media
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol,Diesel)पुरावा केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र आज सकाळपासूनच पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सर्व नद्या, नाले यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. (Collector-order-diesel-petrol-supply-only-for-essential-services-kolhapur-rain-update-akb84)

Summary

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरही पाणी आल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अंतर्तगत मार्ग बंद झाले आहेत.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरही पाणी आल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अंतर्तगत मार्ग बंद झाले आहेत. या सर्व कारणांमुळे इंधनाचे टँकर जिल्ह्यामध्ये येणे अशक्य आहे. त्यामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन पुरवठा केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिस वाहने, आरोग्य विभागाची वाहने, रुग्णवाहीका, वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्ती यांची शासकीय किंवा खासगी वाहने, सर्व प्रकारची शासकीय वाहने, कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची वाहने, ज्या स्वयंसेवी संस्था पूरनियंत्रणाच्या कामात कार्यरत आहेत त्यांच्यी वाहने. एन.डी.आर.एफ, व्हाईट आर्मी, विमानतळ प्राधिकरणाची वाहने, मदत कार्य करणारी वाहने यांनात पेट्रोल-डिझेल दिले जाणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. असेही आदेशात म्हटले आहे.

petrol diesel
Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा बंद

पावसाचे प्रमाण वाढल्याने आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगाला लावल्या होत्या. दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांच्या रांगा होत्या. नंतर नागरिकांना पेट्रोल, डिझेल देणे बंद केल्याने नागरिकांना परतावे लागले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.