Kolhapur Flood : महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसाठी तातडीचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

जिल्ह्यांत 2019 आणि 2021 मध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 52 फूट झाली होती.
Kolhapur Flood Panchganga River
Kolhapur Flood Panchganga Riveresakal
Updated on
Summary

जिल्ह्यातील राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण 94 टक्के पर्यंत भरले आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यांत 2019 आणि 2021 मध्ये ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 52 फूट झाली होती. त्यावेळी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या-ज्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं, त्या सर्व कुटुंबांनी आज 25 जुलै 2023 रोजी सायंकाळपर्यंत सर्व साहित्यांसह स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या (Kolhapur Rain Update) सूचना मिळताच या सर्वांचे निवारागृहात किंवा शिबिरामध्ये स्थलांतर केलं जाणार आहे. त्यामुळं स्थलांतरित होण्यासाठी आजच सर्व तयारी करून ठेवावी, असंही जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी सांगितलंय.

Kolhapur Flood Panchganga River
Balinga Bridge : महापुराचा धोका! कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील 'या' महत्वाच्या पुलावरून आजपासून वाहतूक पूर्णपणे बंद

जिल्ह्यातील राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण 94 टक्के पर्यंत भरले आहे. त्यामुळं पंधरा दिवसांपूर्वी धरणे भरतील की नाहीत अशी परिस्थिती असताना आठवड्यामध्ये ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.

Kolhapur Flood Panchganga River
Sindhudurg Rain : सह्याद्री पट्ट्यात मुसळधार; धबधब्याखाली अडकलेल्या 24 पर्यटकांची पोलिसांनी 'अशी' केली सुटका
  • राधानगरी धरण 8.36 टीएमसी पैकी 7.82 टीएसमी (93.55 टक्के) भरले.

  • काळम्मावाडी (दूधगंगा) धरण 25.39 टीएमसी पैकी 13.10टीएमसी (51.58 टक्के) भरले.

  • वारणा (शिराळा) धरण 34.39 टीएमसी पैकी 26.66 टीएमसी (77.50 टक्के) भरले.

  • राधानगरी पाण्याचा विसर्ग : 1400 क्यूसेक

  • पाण्याखाली असणारे बंधारे : 82

Kolhapur Flood Panchganga River
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क; सवतसडा धबधबा, अडरे धरणावर घातली बंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.