नुकसानीच्या तुलनेत भरपाई तोकडीच

आराखडा, सर्वेक्षणही चुकीचे ठरल्याचे चित्र; नागरिकांना फटका
flood
floodsakal
Updated on

राशिवडे बुद्रुक - गेल्या वर्षीचा पावसाळा राधानगरी तालुक्याला आस्मानी संकट घेऊन आला होता. चोवीस तासात तालुक्‍यातील पश्चिमोत्तर भागात तब्बल ८८९ मिलिमीटर पाऊस पडला. डोंगर खचले, रस्ते बंद झाले. कुपलेवाडीत अख्खे कुटुंब भूस्खलनात गाडले गेले. शेती बांधासह वाहून गेली. भाताच्या खाचरांवर गाळा साचला, उसाची पिके कोलमडली. तिन्ही धरणे तुडुंब भरून वाहिल्याने अनेक गावात पाणी शिरले. आलेला निधी सर्व लाभार्थ्यांना महसूल खात्याने दिला. तरीही पावसाच्या तुलनेत प्रतिवर्षी होणारे पिकांचे नुकसान आणि घटणारी वाढ पाहता ही भरपाई तोकडीच ठरते. आधीच चुकीच्या पर्जन्यमापनामुळे तालुक्यात नुकसानीचा आराखडा आणि सर्वेक्षणही चुकीचे ठरत आला आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे.

कुपले वाडीतील दोन व्यक्ती आणि चार जनावरे यात गाडली तर पडसाळी, तळगाव, दुर्गमानवाड, म्हासूर्ली परिसरात अनेक ठिकाणी डोंगर खचून शेतजमिनी भुईसपाट झाल्या. याचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूल विभागाने केले. परंतु, या एवढ्या मोठ्या नुकसानीच्या तुलनेत हवा तसा पंचनामा येथे झाल्याचे दिसत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर गाळ साचूनही त्यांच्या नोंदी न झाल्याच्या तक्रारी अद्याप आहेत. तरीही तुलनेत सर्व लाभार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात महसूल खात्याला यश आले आहे.

दृष्‍टिक्षेपात

  • शेतीचे एकूण नुकसान १८२१ हेक्टर

  • एकूण लाभार्थी १३९८५

  • जिरायत क्षेत्र ५८९ . ९५

  • फळबाग क्षेत्र ५५.०२ हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.