कोल्हापूर ः महापालिकेची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर याद्यातील घोळ समोर येत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रभाग क्रमांक 32 बिंदू चौक प्रभागाला बसला असून प्रभागातील 2200 हून अधिक मते शेजारच्या प्रभाग क्रमांक 27 ट्रेझरी ऑफिस आणि प्रभाग क्रमांक 31 बाजारगेट मध्ये गेली आहेत. प्रभागरचनेत कोणताही बदल झाला नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात शेजारच्या प्रभागात मतदारांची नावे घुसडल्याच्या या प्रकाराला मावळते नगरसेवक ईश्वर परमार यांनी हरकत घेतली आहेत.
दरम्यान, बाजारगेट प्रभागातील मतदार याद्यीच्या घोळाबद्दलही मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या असून 70 हरकती दाखल झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 32 बिंदू चौकमधील 731 नावे ही शेजारच्या प्रभाग क्रमांक 31 बाजारगेटमध्ये समाविष्ट केली आहेत. तर 1454 नावे ही प्रभाग क्रमांक 27 ट्रेझरी ऑफिसमध्ये घातली आहेत. येथील प्रभागरचना बदलली नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात मतांचा घोळ घालणे चुकीचे असून ही नावे पुर्ववत प्रभाग क्रमांक 32 मध्येच समाविष्ट करावीत, अशी मागणीही ईश्वर परमार यांनी केली आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 31 बाजारगेटमध्ये पंचगंगा तालीम प्रभागातील 51, रंकाळा स्टॅड प्रभागातील118 मते आणि बिंदू चौक प्रबागातील 764 मते समाविष्ट केल्याबद्दलही बाजारगेट प्रभागातील नागरिकांच्या हरकती आहेत.
याद्यीवर 92 हरकती
दरम्यान, आज महापालिकेच्या गांधीमैदान विभागीय कार्यालयाकडे14, शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडे 75, राजारामपूरी विभागीय कार्यालयाकडे 1, ताराराणी मार्केट कार्यालयाकडे 2 हरकती दाखल झाल्या आहेत.
सुट्टी दिवशीही मतदार यादी पाहण्याची सुविधा
महानगरपालिका मतदार यादी चारही विभागीय कार्यालयात सुट्टी दिवशीही पाहण्याची व्यवस्था केली आहे. शुक्रवारी (ता.19) शिवजयंती निमित्त व शनिवार व रविवारी सुटटी असल्याने या दिवशीही प्रभागनिहाय मतदार यादी प्रभागात, विभागीय कार्यालय क्रमांक.1 ते 4 मध्ये तसेच मुख्य निवडणूक कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध असेल. त्याचबरोबर या मतदार यादीवरील हरकती प्रभागातील संबंधित विभागीय कार्यालयक्र.1 ते 4 अंतर्गत कार्यरत असणारे उपशहर अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दाखल करता येतील.
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.