Kini Toll Plaza : 'खर्डा-भाकरी घेऊन आलोय, आता टोल बंद केल्याशिवाय मागं हटणार नाही'; आमदार सतेज पाटलांचा इशारा

Kini Toll Plaza : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरु आहे.
Congress Agitation
Congress Agitationesakal
Updated on
Summary

आंदोलनादरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही अशी भूमिका घेत थेट काँग्रेस कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडला.

कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर पडलेले खड्डे यांमुळे वाहनधारकांना होणारा त्रास या प्रश्नी आज (शनिवार) कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्यावर (Kini Toll Plaza) आंदोलन करण्यात आले.

खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर-पुणे महामार्गावर टोल का द्यायचा? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन सुरु आहे. काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राहुल (पी.एन.) पाटील यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Congress Agitation
Congress Agitation

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरु आहे. आंदोलनादरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही अशी भूमिका घेत थेट काँग्रेस कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडला.

Congress Agitation
'राज्यातील सामाजिक परिस्थितीची जाण असलेले नेते शरद पवाराच आरक्षणाचा प्रश्‍न सोडवतील'; OBC नेते लक्ष्मण हाकेंना विश्वास

टोल बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही - सतेज पाटील

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज पुण्यातून कोल्हापूरला येण्यासाठी सात ते आठ तास लागतात. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उद्या रुग्णाला जरी न्यायचे झाल्यास त्याला देखील त्याचा फटका बसतो. जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत तोपर्यंत एक रुपयाही टोल घेऊ नका. आज भाकरी घेऊन आलो आहे, निर्णय घ्या आंदोलन मागे घेतो. पण टोल बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.