Soniya Gandhi: काँग्रेस महाअधिवेशनात सोनियांचा हल्लाबोल; राहुल यांच्या ‘भारत जोडो’चे कौतुक

विरोधकांचा आवाज निर्दयीपणे दाबला जातो
Soniya Gandhi
Soniya Gandhisakal
Updated on

देश आणि काँग्रेस पक्षासाठी हा मोठा आव्हानात्मक काळ आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे.

निर्दयीपणे विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही मोजक्या उद्योगपतींना झुकते माप देऊन देशाच्या अर्थकारणाची वाट लावली जात आहे. सर्वत्र विद्वेषाची आग भडकली आहे.

अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि महिलांना लक्ष्य केले जात असल्याचा घणाघात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या ८५ व्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून बोलताना केला.

‘भारत जोडो यात्रा’ काँग्रेससाठी आणि माझ्यादृष्टीने देखील टर्निंग पॉईंट ठरल्याचे त्यांनी नमूद केले. भारत जोडो यात्रेने काँग्रेस आणि सर्वसामान्यांमधील संवादाचा वारसा समृद्ध केला आहे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा केली.

आपल्या भाषणात सोनिया गांधींनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविताना राजकारणात प्रवेशापासून ते काँग्रेस अध्यक्षपद सांभाळल्यानंतरच्या पक्षीय कारकिर्दीपर्यंत आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांचा आलेख मांडला. त्या म्हणाल्या की विरोधकांचा आवाज निर्दयीपणे दाबला जातो.

पहिल्यांदा पक्षाध्यक्ष झाल्यापासून ते आजपर्यंत, अशा मागील २५ वर्षांमध्ये काही चांगले तर काही कटू अनुभव आले.’’ यूपीए सरकार बनविण्याचा अनुभव कथन करताना सोनिया म्हणाल्या की, ‘‘ २००४ आणि २००९ मधील कॉंग्रेसची कामगिरी असो किंवा डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान बनविण्याचा निर्णय असो,

व्यक्तिगत पातळीवर आपल्यासाठी तो आनंद देणारा ठरला. यासाठी पक्ष कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. भारत जोडो यात्रा पक्षासाठी निर्णायक वळण आहे. या यात्रेने काँग्रेस आणि सर्वसामान्यांमधील संवादाचा वारसा समृद्ध केला आहे.’’

नेत्यांशी साधला संवाद

काँग्रेसच्या ८५ व्या महाधिवेशनात शुक्रवारी सुकाणू समितीची बैठक झाली होती. आज पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ध्वजवंदनाने दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ झाला. सुरवातीला खर्गे यांचे भाषण झाले.

Soniya Gandhi
Pune Bypoll Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

त्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख आणि ‘यूपीए’ च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुकाणू समितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे प्रतिनिधी यांच्यासह राज्यांमधून आलेल्या नेत्यांशी संवाद साधला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनात सहभागी झालेले नाहीत. त्यांचा लिखित संदेश संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी वाचून दाखविला.

गुलाब अंथरून प्रियांकांचे स्वागत

कॉंग्रेस अधिवेशनासाठी आलेल्या सर्व नेत्यांपैकी प्रियांका गांधींचे स्वागत सर्वाधिक लक्षवेधी ठरले. रायपूर येथे पोहोचलेल्या प्रियांका गांधी वद्रा यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर गुलाबाचा गालिचा तयार करण्यात आला आला होता.

मुख्यमंत्री भूपेश बघेल विमानतळावर प्रियांकांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. विमानतळाच्या बाहेर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या होत्या. यासाठी सहा हजार किलो गुलाबांचा वापर झाल्याचे सांगण्यात आले.

एससी, एसटींना ५० टक्के आरक्षण

काँग्रेसने या खेपेस पक्षाच्या घटनेमध्ये सुधारणा केली असून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी), महिला, तरुण आणि अल्पसंख्याक यांना कार्यकारी समितीमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता नव्या दुरुस्तीमुळे काँग्रेस कार्यकारी समितीमध्ये माजी पंतप्रधान आणि सर्व प्रदेशाध्यक्षांचा समावेश असेल. कार्यकारी समितीची सदस्य संख्याही २५ वरून ३५ वर नेण्यात आली आहे. पक्ष आता केवळ डिजिटल सदस्यत्वच देणार असून त्याचे रेकॉर्डदेखील डिजिटल असतील.

Soniya Gandhi
Mumbai: मुंबईत घातपाताची धमकी;आरोपीला 10 तासात अटक

सोनियांच्या निवृत्तीची चर्चा

सोनिया यांनी त्यांच्या भाषणामध्ये भारत जोडोसोबत आपली राजकीय कारकीर्दही अंतिम टप्प्यात आल्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते,

पण सोनियांचे ते विधान त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळापुरतेच मर्यादित असून त्याचा राजकारणातून निवृत्ती घेण्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

खर्गे म्हणाले--

  • राहुल गांधींनी संघर्षाची मशाल पेटविली

  • नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक मूर्खपणा होता

  • सरकारमधील लोकांचा डीएनए गरीबविरोधी आहे

  • देशात द्वेषाचे वातावरण असून महागाईमुळे लोक हैराण

  • सत्ताधाऱ्यांचा जनतेचे अधिकार, भारतीय मूल्यांवर हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.