Belgaum Municipal : विरोधी गटनेतेपदासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याचं नाव चर्चेत; पाठिंब्याचं पत्र महापौरांकडं करणार सादर!

डोणी यांना मिळणार विरोधी गटातील सर्वाधिक नगरसेवकांचा पाठिंबा
Congress
Congressesakal
Updated on
Summary

डोणी हे २००७ पासून सलग तीनवेळा महापालिकेवर निवडून गेले आहेत. २००७ व २०१३ साली ते अपक्ष तर २०२१ साली काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक बनले आहेत.

बेळगाव : महापालिकेच्या (Belgaum Municipal Corporation) विरोधी गटनेतेपदासाठी काँग्रेस (Congress) नगरसेवक मुजम्मील डोणी यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती मिळाली आहे. डोणी यांच्याकडून लवकरच नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौर शोभा सोमणाचे यांच्याकडे सादर केले जाणार आहे.

Congress
Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला जामीन मंजूर

विरोधी गटात काँग्रेस नगरसेवकांची संख्या जास्त असल्यामुळे विरोधी गटातील सर्वाधिक नगरसेवकांचा पाठिंबा डोणी यांनाच मिळणार आहे. डोणी हे काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधी गटनेतेपदासाठी पक्षातील स्थानिक नेत्यांकडून डोणी यांच्या नावाची शिफारस होणे आवश्‍यक आहे.

डोणी यांनी त्यासंदर्भात स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर महापौरांकडे रितसर पत्र दिले जाणार आहे. पुढील सर्वसाधारण बैठकीच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी डोणी यांच्याशी संपर्क साधला असता, विरोधी गटनेतेपदाबाबतचे पत्र लवकरच महापौरांकडे देणार असल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली.

Congress
Loksabha Election News: राष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं केली मोठी घोषणा

महापौर निवडणुकीच्या आधीपासून महापालिकेतील विरोधी गटनेतेपद चर्चेत आहे. महापौर निवडणूक जाहीर होताच विरोधी गटातील काही नगरसेवकांनी या पदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, अपक्ष नगरसेवक बाबाजान मतवाले यांचा समावेश होता.

पण, सभागृहात यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती व अपक्ष नगरसेवकांची संख्या कमी आहे. अपक्षांपैकी दोघांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे साळुंखे व मतवाले यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काँग्रेस नगरसेवकांची संख्या जास्त असल्यामुळे विरोधी गटनेतेपदासाठी डोणी यांचे नावही चर्चेत आले.

Congress
K Chandrasekhar Rao : पंढरपूरनंतर गुलाबी वादळ आज सांगलीत; कोणता नेता लागणार गळाला? संपूर्ण राज्याचं KCR दौऱ्याकडं लक्ष

शिवाय, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातून (Belgaum North Assembly Constituency) काँग्रेसचे राजू सेठ निवडून आल्यानंतर महापालिकेत काँग्रेसचे वजन वाढले आहे. डोणी हे आमदार सेठ यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जातात, त्यामुळेही डोणी यांचा विरोधी गटनेतेपदाचा दावा प्रबळ झाला आहे. २१ जुलै रोजी महापालिकेची सर्वसाधारण बैठक इतिहासात प्रथमच विरोधी गटनेता नसताना झाली.

Congress
Swapnali Sawant Case : स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला मोठी कलाटणी; पोलिसांना सापडली मृतदेहाची 8 हाडे, कुजलेलं मांस अन् एक दात

कामकाजाचा अनुभव

डोणी हे २००७ पासून सलग तीनवेळा महापालिकेवर निवडून गेले आहेत. २००७ व २०१३ साली ते अपक्ष तर २०२१ साली काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक बनले आहेत. डोणी यांच्याकडे विरोधी गटनेतेपदाचा अनुभव नसला, तरी अर्थ स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()