Rahul Gandhi: 'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

Congress leader Rahul Gandhi : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना याच विचारधारेनं त्यांच्या राज्याभिषेधकाला विरोध केला होता.
rahul gandhi kolhapur shivaji maharaj statue
rahul gandhi kolhapur shivaji maharaj statueesakal
Updated on
Summary

''मूर्ती ज्यांची बनते त्यांच्या विचाराचं आपण समर्थन करतो. महाराज सर्वांना बरोबर घेऊन जात होते. देश सर्वांचा आहे हे त्यांचे विचार होते. २१ व्या शतकातही तेच विचार आपल्या संविधानात आहे.''

कोल्हापूर : आपल्या देशात एक विचारधारा संविधान वाचायचा प्रयत्न करतेय तर, दुसरी विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या संविधानाला धोक्यात आणण्याचं काम करतेय, असं स्पष्ट मत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केले.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना याच विचारधारेनं त्यांच्या राज्याभिषेधकाला विरोध केला होता, त्याविरोधात महाराज लढत होते.

rahul gandhi kolhapur shivaji maharaj statue
'ते' वक्तव्य भोवलं! काळे झेंडे दाखवत राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा तीव्र विरोध, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

त्यांची नियत नीट नव्हती म्हणून त्यांच्या हातातून अनावरण झालेला पुतळा कोसळला, असा टोला त्यांनी नाव न घेता भाजपला लगावला. त्यांनीच (भाजप) राम मंदिर, संसदेत ‌आदिवासी राष्ट्रपतींना उद्घाटनाला बोलावलं नाही. हीच यांची विचारधारा आहे.

मूर्ती ज्यांची बनते त्यांच्या विचाराचं आपण समर्थन करतो. महाराज सर्वांना बरोबर घेऊन जात होते. देश सर्वांचा आहे हे त्यांचे विचार होते. २१ व्या शतकातही तेच विचार आपल्या संविधानात आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.