'महायुती सरकार तिजोरी साफ करून तिजोरीही विकायच्या प्रयत्नात'; सरकारच्या 'त्या' निर्णयांवर वडेट्टीवारांना संशय

Congress leader Vijay Wadettiwar : ‘महायुतीचा प्रत्येक मंत्री मंत्रालयाची तिजोरी साफ करण्याचे काम करत आहे.
Congress leader Vijay Wadettiwar
Congress leader Vijay Wadettiwaresakal
Updated on
Summary

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला लोकप्रियतेची सूज आलेली आहे. मात्र, ही सूज येत्या विधानसभा निवडणुकीत उतरली जाणार आहे.''

कोल्हापूर : ‘महायुती सरकार सवंग लोकप्रियतेसाठी धडाधड निर्णय घेत आहेत. दोन महिन्यांत ३५० परिपत्रके काढली आहेत. यासाठी एक लाख ४४ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा वाढता खर्च पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारसाठी (Mahayuti Government) ३० हजार कोटींचा ओव्हर ड्राफ्ट घेण्याची नामुष्की ओढवली आहे. यातूनच सरकारवर कर्जाचा डोंगर वाढला असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.

‘महायुतीचा प्रत्येक मंत्री मंत्रालयाची तिजोरी साफ करण्याचे काम करत आहे. जे मिळेल ते लुटा, अशी परिस्थिती मंत्रालयात दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले, ‘महायुती सरकार तिजोरी साफ करून तिजोरीही विकायच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला लोकप्रियतेची सूज आलेली आहे. मात्र, ही सूज येत्या विधानसभा निवडणुकीत उतरली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेऐवजी सुरक्षित बहीण योजना सुरू केली पाहिजे होती. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.’

Congress leader Vijay Wadettiwar
Nitin Gadkari : 'झाले बहु, होतील बहु यासम हा' असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व; काय म्हणाले गडकरी?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांकडे सांगण्यासारखे काहीही नाही. चुकीचा कारभार सुरू आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती सरकारला निश्‍चितपणे घरी बसावे लागणार आहे.’

Congress leader Vijay Wadettiwar
'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘महायुती सरकारला बहीण लाडकी नाही, तर ‘सत्ता लाडकी’ आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये त्यांची दहा वर्षे कठीण गेली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटात त्यांचा भविष्यकाळ उज्‍ज्वल राहील. सध्याचे सरकार मतांसाठी काहीही आश्वासने देत आहे. राज्यात भारतीय जनता पार्टीने धर्माविरुद्ध धर्म, जातीविरुद्ध जाती असे वातावरण निर्माण केले आहे.’ या वेळी माणिकराव ठाकरे, माजी खासदार जयवंतराव आवळे आदी उपस्थित होते.

जागा वाटपासंदर्भात बहुतेक चर्चा पूर्ण

‘जागा वाटपासंदर्भात बहुतेक चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडी सोमवारपासून (ता. ७) सलग तीन दिवस जागा वाटपासाठी चर्चेला बसणार आहे. यामध्ये बरेच काम पूर्ण होणार आहे. काही जागांबद्दल चर्चा सुरू राहणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.