आमदार चंद्रकांत जाधव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जाधव हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून उभे होते
आमदार चंद्रकांत जाधव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आमदार चंद्रकांत जाधव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कारsakal media
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (वय ५९) यांचे हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (ता.१) मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी नगरसेविका जयश्री, मुलगा, विवाहीत मुलगी असा परिवार आहे.

आमदार चंद्रकांत जाधव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कर्नाटकात आढळलेल्या ओमिक्रॉन संक्रमित रुग्णानं सोडला देश!

जाधव हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून उभे होते. त्यांच्या विजयाने सलग दहा वर्षे शिवसेनेकडे असलेली ही जागा काँग्रेसने खेचून आणली होती. कोरोनाच्या साथकाळात जाधव यांनी रस्त्यावर उतरून लोकांना दिलासा देण्याबरोबरच आरोग्यसेवेसाठी प्रयत्न केले. या दरम्यान दोन्हीही लाटेत त्यांना दोन वेळा कोरोनाची लागणही झाली होती. उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या सामाजिक कार्याला सुरूवात केली होती.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये जाधव यांना अन्ननलिकेच्या आजाराचा त्रास जाणवू लागला. त्यावर त्यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेतले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेत ‘स्टेन’ घातला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. कोरोनाची साथही ओसरल्याने ते पुन्हा सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय झाले होते. पंधरा दिवसांपासून त्यांच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले होते. तो बळावल्याने कोल्हापुरातील रुग्णालयातून त्यांना काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथेच काल रात्री त्यांचे निधन झाले.

आमदार चंद्रकांत जाधव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई : ओमिक्रॉनचे मुंबईत 10 संशयित रूग्ण

"आमदार चंद्रकांत जाधव तरुण व होतकरू आमदार म्हणून ओळखले जात. आमदार म्हणून ते नवीन असले तरी त्यांचा कामाचा आवाका मोठा होता. खेळ तसेच औद्योगिक क्षेत्राकडेही त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांच्या अनपेक्षित जाण्याने कोल्हापूरचे मोठे नुकसान झाले आहे."

- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

"एका उमद्या सहकाऱ्याचे असे अकाली जाणे क्लेशदायक आहे. मूळचे खेळाडू असलेल्या चंद्रकांत जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल सुरू केली होती. राजकारण आणि उद्योजकता याचा समतोल सांभाळला. जाधव यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना."

- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

"जनतेशी नाळ घट्ट असलेला आमदार आपण गमावला. उद्योग, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांत त्यांनी आपला गोतवळा निर्माण केला होता. लोकांत मिसळून त्यांचे प्रश्‍न समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यात त्यांची हातोटी होती. एक उदयोन्मुख आणि प्रश्‍न प्रभावीपणे मांडून ते तडीस नेणारा आमदार म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. आज एक स्नेही, भावासारखा ज्येष्ठ मित्र गमावल्याची भावना खूप क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे."

- सतेज पाटील, पालकमंत्री

"चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी गमावला आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो."

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()