Shiv Sena Controversy : शिवसेना ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; इंगवलेंचा पवारांवर रोष, काॅल रेकॉर्डिंग व्हायरल

Ravikiran Ingawale vs Sanjay Pawar : करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्याचा कार्यक्रम हा रवी इंगवले यांचा नसून तो पक्षाचा आहे.
Ravikiran Ingawale vs Sanjay Pawar
Ravikiran Ingawale vs Sanjay Pawaresakal
Updated on
Summary

मेळाव्यात इंगवले यांनी पुन्हा एकदा बुकशेठ यांचा उल्लेख करून बाळा पुन्हा अशी चूक करू नकोस, असे सांगितले.

कोल्हापूर : शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. याच्या निमंत्रणपत्रिकेत शहरप्रमुख रविकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांचे नाव नव्हते. यामुळे इंगवले यांनी उपनेते संजय पवार (Sanjay Pawar) यांचे स्वीय सहायक अभिजित बुकशेठ यांना भ्रमणध्वनी करून जाब विचारत पवार यांच्यावर रोष व्यक्त केला. त्या संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले असून, पवार-इंगवले वाद चव्हाट्यावर आला.

भ्रमणध्वनीतील इंगवले व बुकशेठ यांचे व्हायरल झालेले संभाषण असे, इंगवले यांनी भ्रमध्वनी करून ‘अहो बुकशेट आम्ही जिवंत आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव नसले तरी आम्ही पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहोत. तुमच्या नेत्याला (संजय पवार) सांगा हे योग्य नाही. शिवसेना (ठाकरे गट)हा पक्ष केवळ पवार, देवणे आणि मोदी यांचा नसून, तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. पक्षाचा मालक व्हायचा प्रयत्न करू नका. करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्याचा कार्यक्रम हा रवी इंगवले यांचा नसून तो पक्षाचा आहे.

Ravikiran Ingawale vs Sanjay Pawar
'शरद पवार शांत राहून काय करतील हे कोणालाच कळणार नाही, ते मुरब्बी राजकारणी'; शिवसेना नेत्याचं मोठं विधान

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पक्षाला मिळावा, यासाठी हा कार्यक्रम आहे. तुमच्या असल्या वागण्यामुळेच राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यात दुफळी निर्माण झाली. सध्या पक्ष अडचणीत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. आमच्या पक्षाचे तिकीट जाऊ नये ही आमची इच्छा आहे. उमेदवारी कोणालाही मिळो, मी दिवस-रात्र त्याच्यासोबत राहून प्रचार करेन. झालेल्या प्रकाराबाबत मी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे इंगवले यांनी म्हटले आहे.

Ravikiran Ingawale vs Sanjay Pawar
Hasan Mushrif : समरजित घाटगेंवर टीका करताना हसन मुश्रीफांची जीभ घसरली; म्हणाले, कोणत्या प्रवृत्तीमुळं ED चं...

मेळाव्यातही वादाचे पडसाद

मेळाव्यात इंगवले यांनी पुन्हा एकदा बुकशेठ यांचा उल्लेख करून बाळा पुन्हा अशी चूक करू नकोस, असे सांगितले. यावर संजय पवार यांनी बुकशेठ यांचा यात काही दोष नसल्याचे स्पष्ट केले, तर इंगवले यांनी उद्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत पक्षातील कोणालाही कल्पना नाही, असे सांगितले. यामुळे हा वाद येथे अधोरेखित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.