प्रत्येक तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजनसह उपचार तेथेच देण्यासाठी नियोजन केले आहे.
कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट (covid -19) येणार आहे. त्या अनुशंगाने लहान मुलांसाठी कोल्हापूर, इचलकंरजी आणि गडहिंग्लज येथे ११६ केअर सेंटर्स (covid care centers) तयार केले जात आहेत. प्रत्येक तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजनसह उपचार तेथेच देण्यासाठी नियोजन केले आहे. यासाठी शासनाची मंजुरी मिूळाली असून हे काम सुरू झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी आज पत्रकारांना दिली. महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर विभागांची आढावा बैठक त्यांची आज घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांनी संवाद साधला.
यावेळा पालकमंत्री पाटील म्हणाले, 'तिसऱ्या लाटेत व्हेन्टीलेट आवश्यक असेल तरच रुग्णाला तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी किंवा कोल्हापुरात यावे लागेल अन्यथा तालुक्यातच उपचार दिले जातील. तसेच खास गडहिंग्लजसाठी १०० बेडचे फ्लिल्ड हॉस्पीटल उभारले जात आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. दुसऱ्या लाटेतील मुख्य काळात १९ हजार ९६२ रुग्ण होते. आता २९ हजार असतील, म्हणजे साधारण दीड पट असतील या अनुशंगाने दहा हजार बेडचे नियोजन केले आहे. विशेषतः लहान मुलांसाठी इचलकरंजी येथील आयजीएम मध्ये ३२, सीपीआर मध्ये ४२ आणि गडहिंग्लज मध्ये ४२ लहानमुलांसाठी काळजी सेंटर उभारले जाणार आहे. तसेच कोल्हापुरात सीपीआर मध्ये मध्ये लहानमुलांसाठी आयसीयू तर इचलकरंजीमध्ये ५० तर गडहिंग्लज मध्ये ४० बेड असणार आहेत. यामुळे ज्या त्या तालुक्यांच्या प्रमुख ठिकाणी उपचार मिळणे शक्य होणार आहे. लहान मुलां व्यतिरिक्त इतर सर्वांसाठी तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजनसह उपचार मिळावेत याची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष करून गडहिंगग्लज तालुक्यात १०० बेडचे फिल्ड हॉस्पीटल सुरू करीत आहोत.'
लसीकरणाबद्दल (covid -19 vaccine) पाटील म्हणाले, 'सर्वांना कोरोनाचे डोस दिले जावेत यासाठी प्रयत्न सुरू असून पहिला डोस बहुतांशी नागरिकांचा झाला असून दुसरा डोसही लवकरच पूर्ण होईल. यामध्ये विशेष करून लहान मुलांच्या आई-वडिलांना, ज्यांची मुले किंवा आई-वडील आजारी आहेत. यांच्यासाठी प्राधान्य दिले गेले आहे. त्याचे लसीकरण तातडीने केले जात आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यातील १२ ठिकाणचे प्लॅन्ट दहा-पंधरा दिवसांत सुरू होतील. त्याचे काम पूर्णत्वाकडे पोचले असून काही ठिकाणी पूर्ण झाले आहे.'
तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. त्या अनुशंगाने प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेले सर्व नियम पाळावेत. अद्याप कोविड पूर्णपणे संपलेला नाही याचा विचार करावा. मास्क वापरावा, थोडाही संशय आला तरीही वेळीच उपचार घ्या. असेही आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.