देवा तुझ्या डोंगरावर लॉकडाऊनचा पहारा ; गुलाल तुझ्या नावाचा आता उधळावा कसा ?

corona effect on jotiba mandir kolhapur
corona effect on jotiba mandir kolhapur
Updated on

जोतिबा डोंगर - जोतिबाची चैत्र यात्रा येत्या मंगळवारी (ता.७) येऊन ठेपली आहे. या यात्रेच्या पूर्वसंध्येला मात्र यंदा जोतिबाच्या डोंगरावर अगदीच शांतता दिसत आहे. ना हलगीचा ताल,  ना पिपाणी चा सुर, ढोल ताशांचा ठेका... चांगभलचा जयघोष नाही, ना गुलालाची उधळण, ना कसला भाविकांचा गोंगाट, अशी स्थिती डोंगरावर अनुभवायला मिळत आहे. यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भाविकांनीही जोतिबावर येण्यास बंदी घातल्यामुळे साहजिकच त्यांनी डोंगराकडे पाठ फिरवली आहे.

एरवी दररोज जोतिबा डोंगरावर हजारोच्या संख्येकेने भाविक यायचे. भाविक डोंगरावर दाखल झाले की बसस्थानक ते मुख्य मंदिरापर्यंत सर्वत्र 'दवणा घ्या दवणा.. अहो पाहुणं आपल्या मुला बाळांना लस्सी घ्या लस्सी.. गुलाल खोबरे घ्या.. गरमा गरम बासुंदी चहा घ्या...'

या आरोळ्या सतत कानी पडायच्या. मंदिर परिसरात तर हिरव्यागार काकड्या, डोंगरची काळी मैना (करवंदे, जांभूळ, आंबा ) हा रानमेवा घेण्यासाठी भाविकांची लगबग दिसायची, पूर्ण डोंगर भाविकांनी गजबजून जायचा.पण गेल्या पंधरा दिवसापासून जोतिबा डोंगर डोंगरचे हे चित्र कोरोना व्हायरसमुळे अचानक बदलत गेलं. जोतिबाचे मंदिर बंद करावे लागले, भाविकांना ही मुखदर्शन, कळस दर्शन,शिखर दर्शन घेऊनच परतावे लागले. गेल्या पंधरा दिवसापासून मात्र भाविकांना डोंगराव येण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली. सर्रास भाविकांनीही प्रशासनाचा आदेश पाळा. त्यांनी ही  डोंगरावर येण्याचे  टाळले. भाविकांनी अगदी आप आपल्या गावातूनच दख्खनच्या राजाला नमन करण्यास सुरूवात केली आहे. यंदा मानाच्या ९६  सासन काठ्या ज्या त्या गावात उभ्या केल्या असून त्यांना डोंगरावर येण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने चैत्र यात्रेचा विधि त्यांना गावातील पादुका मंदिरात किंवा गावाच्या वेशीवर करावा लागणार आहे.

 जोतिबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार असून डोंगरावर ग्रामस्थां शिवाय चिट पाखरू ही दिसत नाही. जोतिबा यात्रेतील पालखी सोहळया विषयी  भाविकांना  उत्सुकता आहे.  हा सोहळा  निघणार का ? या विषयी  डोंगरावर  संभ्रमावस्था आहे. सोमवार ते बुधवार पर्यंत पूर्णपणे संचार बंदीच आहे  त्यामुळे जोतिबा भक्तांना जोतिबा यात्रेपासून अलीप्त राहावे लागणार आहे . 

 मी जोतिबा मंदिरात अनेक वर्षापासून बंदोबस्ताचे काम करतो. इतर वेळी डोंगरावर इतकी गर्दी असायची की दर्शन रांग कधी संपते याचा विचार करायचो. रात्री उशिरापर्यंत ही भाविक येत राहायचे पण सध्या कोरोना व्हायरसमुळे पूर्ण डोंगरच शांत आहे. मंदिर परिसरात केवळ पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो आहे. डोंगरावर शांतता असल्याने वेळ जात नाही.

एम.एल. पाटील -
पोलीस हवालदार (कोडोली पोलीस ठाणे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.