कोरोनाबाधीताचा अनुभव नक्की वाचा , , निगेटिव्ह अहवालाने परीक्षेत पास झाल्याचा आनंद झाला

 Corona shocked by positive report, happy to pass the negative report
Corona shocked by positive report, happy to pass the negative report
Updated on

कोल्हापूर  ः इचलकरंजीतील माझ्या मित्रांचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या ट्रॅकिंग हिस्ट्रीमध्ये माझेही नाव होते. मला ही कणकण होती. अंग दुखत होते. त्यामुळे माझा स्वॅब घेतला. ज्या क्षणाला स्वॅब घेतला, त्याच क्षणापासून माझी धाकधूक सुरू झाली. दहावी-बारावीचा निकाल जस जसा जवळ येतो, त्यावेळी धाकधूक वाढते. तशी अवस्था माझी झाली होती. आणि दीड-दोन दिसवासांच्या प्रतीक्षेनंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि एकच जबर धक्का बसला. क्षणभर काहीच सुचत नव्हते. टीव्हीवर पाहिलेले प्रसंग, वाचलेले प्रसंग क्षणात डोळ्यासमोर आले. माझ्यामुळे आता किती जणांना याचा त्रास सोसावा लागणार? कुटुंबीयांचे काय, उपचार योग्य होतील, की नाही? अशा भीतीच्या भोवऱ्यात काही तास गेले. मात्र नाईलाजास्तव रुग्णालयात दाखल झालो. 

डॉक्‍टरांकडून उपचार म्हणून ऍन्टीबायोटिक्‍स्‌, सलाईन, छातीचा एक्‍सरे, रक्ताचे नमुने घेतले. उपचार सुरू झाले. तेव्हाही भीतीने गार झालो होतो. मात्र दुसऱ्याच दिवशी सावरलो. माझ्यामुळे पत्नीचाही स्वॅब घेण्यात आला. दीड-दोन दिवसांनी तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आम्ही एकाच खोलीत दोघांना धीर देत जगत होतो. आयुष्याची काळजी माझ्यासह पत्नीच्या चेहऱ्यावर, आवाजात स्पष्ट जाणवत होती. 
दरम्यान, अनेक हितचिंतकांनी, नातेवाईकांनी फोनवर संपर्क साधून धीर दिला. व्हॉटस्‌ ऍपवरून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यामुळेही काही प्रमाणात धीर मिळत होता. पत्नीचा आणि माझा दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह असल्यामुळे समर्थांचा धावा क्षणाक्षणाला सुरू होता. औषधोपचार सुरू होते. प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी डॉक्‍टर, नर्स प्रयत्न करीत होते. दिवसांतून तीनवेळा डॉक्‍टर आमच्याकडे सखोल चौकशी करीत होते. या वेळी प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या सूचना क्षणाक्षणाला आठवत होत्या. 
"प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे. हात साबनाने धुतले पाहिजेत, सॅनिटायझर वापरले पाहिजे. सर्व काही कळत होते, पण वळत नव्हते.' अशी समाजाची अवस्था उघड्याडोळ्यांना समोर दिसत होती. 
बघताबघता एक एक दिवस पुढे जात होता. तस तसा मी सावरत गेलो. यशस्वी उद्योजकांची, जगभर नावलौकिक असलेल्या चौघांची आत्मचरित्रे वाचून काढली. एक दिवस आला आणि माझा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगितले. आणि क्षणभर परीक्षेत पास झाल्याचा आनंद झाला. सुटलो एकदा...असे वाटले. 

अन्य आजार नसल्यानेच वाचलो! 
माझा अहवाल निगेटिव्ह आल्यावर मी स्वतंत्र खोलीत आणि पत्नी स्वतंत्र खोलीत राहू लागलो. तीन दिवसांनी तिचाही अहवाल निगेटिव्ह आला. आम्ही दोघेही घरी आलो. त्याच क्षणी संपूर्ण भूतकाळ डोळ्यासमोर आला. आणि खरोखरच कोणतेही इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब) नसल्यामुळे तरल्याची भावना निर्माण झाली. आज होम क्वॉरंटाईन आहोत. सुरक्षित आहोत. सर्वांनी मास्क वापरा आणि काळजी घ्या ही माझी कळकळीची विनंती आहे. 
 संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.