कोल्हापुरात आजपासून कोरोना प्रतिबंधक लस; जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया

corona vaccine provide kolhapur district with app registration process
corona vaccine provide kolhapur district with app registration process
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात ज्येष्ठ लोकांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी एक ते दीड लाखापर्यंत कोरोना लशीचे डोस येणे अपेक्षित आहे. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने व जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केली आहे. आज ही लस कोल्हापुरात येणार आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे. 

जिल्ह्यात सीपीआरसह २६ आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. तसेच ही मोहीम वाढवण्यासाठी खासगी दवाखान्यातही लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी दिली. जि. प. आरोग्य विभागाकडून कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे माहिती व प्रशिक्षण दिले. तसेच, जिल्ह्यातील खासगी दवाखान्यातही ही लस दिली जाणार असल्याने त्यांची बैठक घेऊन त्यांना याची आज माहिती दिली. 

डॉ. साळी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि इतर आजार असणाऱ्या ४५ वर्षापर्यंतच्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील अशा प्रत्येक नागरिकापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. ॲप डाऊनलोड करुन डाटा घेण्याचे प्रशिक्षण दिले आहे. उद्या सुमारे एक ते दीड लाखापर्यंत लसीचे डोस येण्याची शक्‍यता आहे. यावर खासगी रुग्णालयातही लस दिली जाणार आहे. त्यानुसार त्यांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

शहरातील ३९ खासगी दवाखान्यात मिळणार लस :

कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ आर्थोपेडिक (स्टेशन रोड), वारणा इन्स्टिट्यूट ऑफ युरो सर्जरी (बी. टी. कॉलेजसमोर शाहूपुरी), ॲपल हॉस्पिटल अँड रिसर्च (भोसलेवाडी), मसाई हॉस्पिटल (लुगडी ओळ), केपीसी मल्टी स्पेशालिटी (महाराणा प्रताप चौक),  स्वस्तिक हॉस्पिटल शिवाजी पार्क (सयाजी हॉटेलसमोर), डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (कदमवाडी),  जोशी हॉस्पिटल लिशा हॉटेलसमोर (कदमवाडी),  डायमंड सुपरस्पेशालिटी (नागाळा पार्क), टुलिप हॉस्पिटल (रुईकर कॉलनी), ओम साई ऑन्को सर्जरी हॉस्पिटल मेन रोड (कसबा बावडा), सिद्धिविनायक नर्सिंग होम (टाकाळा),  श्री सिद्धिविनायक हार्ट फाऊंडेशन (शास्त्रीनगर), सनराईज हॉस्पिटल (शिवाजी पार्क), मगदूम इंडो-सर्जरी इन्स्टिट्यूट (शास्त्रीनगर), कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल (ताराराणी चौक).

ॲपवरून अशी होणार नोंदणी

कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाईन ॲप आहे. हे ॲप आज सुरु झाले आहे. cowin.gov.in या ऑनलाईन ॲपवर आपला मोबाईलनंतर टाकावा. त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल. आलेला ओटीपीद्वारे आपले अकाउंट काढा. त्यानंतर तुमचे नाव, वय, लिंग अशी माहिती देऊन आपली ओळख देणारे कार्ड (उदा : आधारकार्ड, पॅनकार्ड) जोडा. ४५ वर्षाच्या रुग्णांनी इतर आजार असल्याचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी जवळचे आरोग्य केंद्र भरु शकता. यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. त्यानुसार आपली नोंदणी पूर्ण होईल आणि त्यानंतर आपण लस घेण्यास पात्र ठरू शकणार आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.