या दांपत्याला चार मुली आहेत. पैकी एकीचा विवाह झाला आहे. ती बाळंतपणासाठी माहेरी आहे. उर्वरित तीनपैकी एक पाचवीला, एक आठवीला, तर एक बारावीमध्ये शिकत आहे.
राशिवडे बुद्रुक : दिवाळीचा (Diwali Festival) बाजार करून घरी परतणारे दांपत्य काल येथे झालेल्या अपघातात ठार झाले. येळवडे (ता. राधानगरी) ते राशिवडेदरम्यान टेम्पो आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. त्यात संजय वसंत कांबळे (वय ४८) व त्यांची पत्नी सुरेखा (४०, दोघे रा. पुंगाव, ता. राधानगरी) ठार झाले. सायंकाळी सातच्या सुमारास अपघात झाला.