कोल्हापूर : थ्रीडी रांगोळीने सजणार अंगण

दिवाळीचा सण रंगावलीचे मनोहरी प्रदर्शन घडवणारा
कोल्हापूर : थ्रीडी रांगोळीने सजणार अंगण
कोल्हापूर : थ्रीडी रांगोळीने सजणार अंगणsakal
Updated on

कोल्हापूर : दिवाळीचा सण रंगावलीचे मनोहरी प्रदर्शन घडवणारा. घरोघरीच्या किशोरी, युवतींसह महिला ठिपक्यांची, आडव्या-उभ्या रेषांची, पाना-फुलांची नक्षीदार रांगोळी रेखांकनात गर्क होतात. एकेक ठिपके जोडून, रंगबिरंगी नक्षीतून रांगोळीच्या कल्पना इतक्या झेपावल्या आहेत की, यंदा थ्रीडी (त्रिमिती) व पोस्टर प्रकारच्या रांगोळीतून घरोघरीचे अंगण सजणार आहे. या दोन्ही पद्धती ऐकायला ‘मॉडर्न’ असल्या तरी त्याची परिणामकारकता मोहिनी घालणारी आहे.

रांगोळी ही परंपरेचे प्रतीक. रांगोळीला कल्पकतेची जोड देत कलाकार, युवतींनी प्रयोगशील बनवले. त्याचाच नवा पैलू म्हणजे थ्रीडी व पोस्टर रांगोळी. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज आणि तुळशी विवाह अशा दिवाळीच्या विविध दिवशी थ्रीडी रांगोळीतील विविध प्रकार या कलाकारांकडून साकारले जात आहेत. घरच्या घरीही रांगोळीतील हे प्रयोग अनेक महिला करत आहेत.

कोल्हापूर : थ्रीडी रांगोळीने सजणार अंगण
कठोर शर्ती घाला, पण जामीन द्या; आर्यन खानच्यावतीने विनंती

आजवर तैलरंग, जलरंगातील चित्रांची मोहिनी कायम आहे. काही कलाकार हुबेहूब रांगोळीही तशीच रेखाटतात. जीडी, फाईन आर्ट, एएम असे चित्रकलेच्या अंगाने शिक्षण घेतलेले कलाकार घरोघरी पोस्टर रांगोळीची कलासेवाही देणार आहेत. एखादे सुबक दृश्य परिणामकारक रंगसंगतीसह पृष्ठभागावर उमटवून यंदाची दिवाळी अधिक चैतन्यदायी करणार आहेत.

रांगोळीतून शोधला रोजगारही

तंत्रसाधनांचा वापर करत आकर्षक, टिकाऊ आणि मोहक रांगोळी काढण्याची कला, त्याला व्यावसायिकतेची जोड देत थ्रीडी, पोस्टर रांगोळीतून रोजगारही शोधला आहे. किंबहुना अशा कलाकारांना ऑर्डर मिळाल्या तर त्यांना आर्थिक हातभार लावण्यासोबत त्यांची दिवाळीही समृद्धतेची होणार आहे.

कोल्हापूर : थ्रीडी रांगोळीने सजणार अंगण
बुलडाणा अर्बनच्या व्यवहारांची आयकर कडून चौकशी सुरू

दिवाळीसाठी अंगणातील रांगोळी कशी वेगळी दिसेल, याबाबत महिला जागरूक असतात. दिवाळीचा ‘फिल’ देणाऱ्या पणत्या, आकाशकंदिल, दिवा, लक्ष्मीपूजनातील कलश, नाणी, पाडव्याला पूजली जाणारी वही, तुळशी वृंदावनाचा हुबेहूब भास या रांगोळीतून मिळतो. यासाठी दिवाळीच्या विविध दिवसांसाठी खास थ्रीडी व पोस्टर रांगोळी रेखाटण्याकडे अनेकजणी पसंती देतात.

-सीमा कवठेकर, रंगावलीकार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()