कोल्हापूर: कोरोनाच्या (covid 19) महामारीला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन (Lockdown)केले. त्यामुळे मुलांचे भावविश्व काहीसे सीमित झाले. शिक्षणाची पद्धती बदलली. याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. मनोविकार समुपदेशक ऊर्मिला चव्हाण (Psychiatric counselor Urmila Chavan)यांनी केस स्टडीच्या माध्यमातून सुमारे १०० मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. त्यातून त्यांना मुलांच्या वागण्यातील, बोलण्यातील बदल जाणवले. त्यांनी या बदललेल्या मानसिकतेचा घेतलेला आढावा. (covid-19-impact-changed-the-mindset-of-children-kolhapur-marathi-news)
शैक्षणिक समस्या
- ऑनलाईन शिक्षणामुळे स्क्रीनचा वापर वाढला (मोबाईल, संगणक)
- पुस्तक हातात घेऊन वाचण्याची सवय कमी झाली.
- लेखनाची गती कमी झाली. हस्ताक्षर बिघडले.
- एकाग्रचित्ताने ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी झाली.
- पर्यायी शब्द न सुचणे, नीट व्यक्त न होता येणे.
वर्तणुकीतील बदल (बिहेविअर)
- चिडचिड होणे
- दिवस कंटाळवाणा जाणे
- चारचौघांत धाडसाने बोलता न येणे
- स्थूलता वाढणे
- घरात भांडणे होणे
- किशोरवयीन मुलांना पालकांची ओढाताण दिसल्याने भविष्याची चिंता सतावणे
- अनिश्चित जेवण, झोपेच्या वेळा बदलल्या.
- जंकफूड, फास्टफूडचे प्रमाण वाढले.
सोशल मीडियाचा अतिरेक
- आभासी जगात रममाण होणे
- अश्लील साईट पाहणे
- मुलांची भाषा बदलली
- बोलताना सोशल मीडियावरील शब्द जास्त वापरणे
- इंटरनेटवरील गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
मानसिकतेत बदल
- पटकन राग येणे
- छोट्या अपयशाने खचून जाणे
- व्यसनाधीनतेकडे वळणे (अपवादात्मक उदाहरणे)
- मरण्याची भीती वाटणे (कोरोनामुळे नातलगांचे मृत्यू)
- असुरक्षित वाटणे
- एकलकोंडेपणा वाढणे
मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक
- मुलांचे दैनंदिन वेळापत्रक पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन ठरवावे
- अभ्यासात लेखन, वाचनावर अधिक भर द्यावा
- अवांतर वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करणे
- ज्ञानवर्धक खेळ मुलांसोबत पालकांनी खेळणे
- इंटरनेटच्या साहाय्याने विविध विषयांवरील माहिती संकलित करायला लावणे
- नकारात्मक विषयांची चर्चा घरी न करणे
- शारीरिक, मानसिक व्यायामाची सवय लावणे
- नवी कला अवगत करणे
- पौष्टिक व सात्विक आहाराचे प्रमाण अधिक ठेवणे
- कुटुंबाने एकत्र बसून सकारात्मक चर्चा करणे
पालकांसाठी आवश्यक
- मोबाईल, संगणकाच्या तांत्रिक बाबी समजावून घेऊन मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवणे
- मुलांसमोर व्यसन, कौटुंबिक वाद, नकारात्मक चर्चा न करणे
- मुलांना नवीन काही करण्यासाठी प्रवृत्त करणे
- आर्थिक विवंचना, ताणतणाव याचा राग मुलांवर काढू नये
कोरोनामुळे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक पातळीवरही संकट ओढवले आहे. मुलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. हे मानसिक बदल चटकन जाणवत नाहीत; मात्र निरीक्षणातील सातत्याने ते लक्षात येतात. यात मुलांचे किंवा पालकांचे वेळेत समुपदेशन केले गेले नाही तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबातील वातावरण उल्हसित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- ऊर्मिला चव्हाण, मनोविकार समुपदेशक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.