कोल्हापुरात मेमध्ये कोरोना रुणसंख्येची विक्रमी नोंद

तीन महिन्यांत ११ लाख चाचण्या; रुग्‍णसंख्या कमी झाली असली तरी खबरदारी घ्यायला हवी
corona update
corona updatesakal media
Updated on

कोल्हापूर : जिल्‍ह्यावर मागील १७ महिन्यांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. पहिल्या लाटेत जवळपास ४५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली, तर दुसऱ्या लाटेत केवळ मेमध्येच रुणसंख्येची विक्रमी नोंद झाली. या महिन्यात ५५ हजार ९३२ लोकांना कोरोनाची लागण झाली. ११ महिन्यांतील कोरोना रुग्‍णसंख्येपेक्षाही अधिकची रुग्‍णसंख्या एकट्या मेमध्ये आढळून आली. कोरोना चाचण्यांचा विक्रमही याच काळात झाला आहे. मागील तीन महिन्यांत म्‍हणजेच मे, जून व जुलैमध्ये ११ लाख १२ हजार चाचण्या करण्यात आल्या. सध्या कोरोनाची रुग्‍णसंख्या कमी होताना दिसत असली तरी तिसऱ्या लाटेची भीतीही कायम आहे. रविवारपासून बहुतांश प्रतिबंधात्‍मक नियम हटवले जाणार असले तरी कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

जिल्‍ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा १ रुग्‍ण सापडला, तेव्‍हापासून जुलै २०२१ पर्यंत एकही महिना असा गेला नाही, ज्यात कोरोनाचा रुग्‍ण सापडला नाही. कोरोना रुग्‍णांची वाढ दिवसेंदिवस वाढतच गेली. जसजशा कोरोनाच्या चाचण्या वाढत गेल्या, तसतशी कोरोना रुग्‍णांची संख्या वाढत गेली, तर पॉझिटिव्‍ह दर कमी होत गेला. कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली, ती डिसेंबर २०२० पर्यंत कमी होत गेली, तर जानेवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून ती आजही कायम आहे. फक्‍त रुग्‍णवाढीचा दर कमी झाला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्‍णांची संख्या दीड पटीने वाढली आहे.

corona update
NCP चा काँग्रेसला धक्का; माजी नगराध्यक्षासह नगरसेविकेनं बांधलं 'घड्याळ'

पहिल्या लाटेत कोरोनाला थोपवणारा जिल्‍हा अशी ओळख असलेल्या कोल्‍हापुरात मात्र दुसऱ्या लाटेने थैमान घातले. दररोजच हजाराच्या संख्येने लोक कोरोनाबाधित होत असतानाच मृत्‍यूचे प्रमाणही लक्षणीय राहिले. बाधित व मृतांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्‍न केले तरी त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जिल्‍ह्यात येऊन सूचना कराव्या लागल्या. कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आणि धडाधड चाचण्या वाढल्या. परिणामी कोरोनाचे रुग्‍णही वाढत गेले. कोरोनाचा जिल्‍ह्यात शिरकाव झाल्यापासून १४ महिन्यांत जेवढ्या चाचण्या झाल्या त्यापेक्षा अधिक चाचण्या मागील तीन महिन्यांत करण्यात आल्या.

कोरोनाची पहिली लाट

वर्ष २०२० एकूण चाचण्या पॉझिटिव्‍ह दर रुग्‍णसंख्या

मार्च १५७ ०.६४ १

एप्रिल १०९४ ०.८२ ९

मे १७६०१ २.७३ ४८१

जून १०२५४ ३.३८ ३४७

जुलै २५५५१ १८.९७ ४८४७

ऑगस्‍ट ६२०२८ २७.८५ १७२७५

सप्‍टेंबर ७४३६३ २८.५९ २१२६०

ऑक्‍टोबर ३६९९५ १०.३३ ३८२२

नोव्‍हेंबर ३८३८६ २.२७ ८७१

डिसेंबर ३७३६० १.४० ५२३

कोरोनाची दुसरी लाट

वर्ष २०२१ एकूण चाचण्या पॉझिटिव्‍ह दर रुग्‍णसंख्या

जानेवारी २९१३२ १.४८ ४३१

फेब्रुवारी २६०२० २.३१ ६०१

मार्च ३७७७८ ४.२७ १६१३

एप्रिल ८४५८४ १८.८८ १५९६९

मे २७२०४१ २०.५६ ५५९३२

जून ३८८१९९ १०.८५ ४२१२३

जुलै ४५१८७१ ८.१८ ३६९४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.