Credit Card : ‘क्रेडिट कार्ड’ ने खरेदीत कोल्हापूर देशात दुसरे; तब्बल १६ हजार २५७ कोटींची थकबाकी

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदीचे व्यवहार करण्यात देशात कोल्हापूरने दुसरे स्थान पटकविले आहे.
Credit Card
Credit Card Sakal
Updated on

- संतोष मिठारी

कोल्हापूर - नव्या गोष्टी आत्मसात करुन त्यात वेगळा ठसा उमटविण्यात कोल्हापूर नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आता प्लॅस्टिक, डिजिटल मनी समजल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदीचे व्यवहार करण्यात देशात कोल्हापूरने दुसरे स्थान पटकविले आहे. क्रेडिट कार्डच्या व्यवहारांची कोल्हापूर जिल्ह्यातील थकबाकीची रक्कम तब्बल १६ हजार २५७ कोटी रुपये इतकी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीतून हे चित्र समोर आले.

या आकडेवारीवर अकारा रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने देशातील जिल्हानिहाय ग्राहकांकडून होणारा क्रेडिट कार्डचा होणारा वापर आणि त्याची थकबाकी याबाबतचे संशोधन केले. त्यासाठी क्रेडिट कार्डच्या थकबाकीची आकडेवारी पाया म्हणून घेतली आहे.

या संशोधनात महाराष्ट्रामधील मुंबई उपनगर पहिल्या, तर कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ चेन्नईचा क्रमांक आहे. राष्ट्रीय पातळीवर क्रेडिट कार्डची जी एकूण थकबाकीचे प्रमाण आहे, त्यात कोल्हापूरची टक्केवारी ८.१ इतकी आहे. देशातील इतर मेट्रो, कॉस्मोपॉलिटन शहरांना मागे टाकत कोल्हापूरने आघाडी घेतली आहे.

आमच्यासाठी ‘सरप्रायजिंग’

देशभरातील बँकांकडून विविध स्वरुपातील व्यवहारांची आकडेवारी ‘आरबीआय’ला सादर केली जाते. त्यानुसार क्रेडिट कार्डच्या थकबाकीच्या सादर झालेल्या गेल्या तीन वर्षांमधील आकडेवारीवर आम्ही एक महिना संशोधन आणि विश्लेषण केले. त्यामध्ये मोठी शहरांचा समावेश असणे अपेक्षित होते; मात्र, कोल्हापूरसारखा जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर येणे आमच्यासाठी ‘सरप्रायजिंग’ आहे.

कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर कसे आले, हे समजत नाही.‘आरबीआय’कडून आणखी काही आकडेवारी घेऊन विश्लेषण करण्याचा विचार सुरु असल्याचे अकारा रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक रोहित सभेरवाल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.