फिर्यादीच निघाला आरोपी! चोरीचा छडा अवघ्या 14 तासांत

फिर्यादीच निघाला आरोपी! चोरीचा छडा अवघ्या 14 तासांत
Updated on
Summary

याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीसह गावभाग इचलकरंजीमधील चौघांना अटक केली.

गारगोटी : भुदरगड पोलिसांनी येथील पाल घाटात टेंपो अडवून केलेल्या चोरीचा छडा अवघ्या १४ तासांत लावला. (crime case) या प्रकरणात फिर्यादीच चोरांच्या टोळीत सहभागी असल्याचे उघड झाले. यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीसह गावभाग इचलकरंजीमधील (ichalakranji) चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. (police action)

फिर्यादीच निघाला आरोपी! चोरीचा छडा अवघ्या 14 तासांत
चोरट्याकडेच मिळाल्या 23 दुचाकी; कारवाईत एकाला अटक

भुदरगड तालुक्यातील गारगोटी- गडहिंग्लज मार्गावर पाल घाटात रविवारी पहाटे अनोळखींनी टेंपोच्या काचेवर अंडी फेकून तो अडविला होता. यानंतर चालक व त्याच्या सहकारी शुभम पाटील यास मारहाण करून त्यांच्याकडील बालाजी बेकरी व्यवसायातील ६७ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. यानंतर टेंपोचालक किरण सुभाष पाटील (इचलकरंजी) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.

पोलिस तपासादरम्यान चालकावरील संशय बळावला. पोलिसांनी त्याला ‘खाक्या’ दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. यानंतर याप्रकरणातील अन्य चोरट्यांची नावे समोर आली. पोलिसांनी संतोष मारुती पाटील (३१), अमोल रमेश रेडेकर (२६), संजय बापूसो तारदाळे (४१ सर्व नदीवेस, गावभाग, इचलकरंजी) यांना अटक केली. अटक केलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांनी या चोरीचा कट रचला होता. या प्रकरणात आणखी काही जण सामील असण्याची शक्यता असून त्याचा शोध सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, सतीश मयेकर व भुदरगड पोलिसांनी ही कारवाई केली.

फिर्यादीच निघाला आरोपी! चोरीचा छडा अवघ्या 14 तासांत
थेट शिवसेना आमदाराला 'NCP'ची ऑफर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.