कोल्हापूर - हुपरीतील बड्या चांदी उद्योजकाची गोळी झाडून आत्महत्या

अमोल माळी यांनी आजारास कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले
कोल्हापूर - हुपरीतील बड्या चांदी उद्योजकाची गोळी झाडून आत्महत्या
Updated on

हुपरी : हुपरी येथील चांदी उद्योजक अमोल बजरंग माळी (वय ५५, रा. केंदीय प्राथमिक शाळा पैसाफंड बँके जवळ, हुपरी) यांनी राहत्या घरी पिस्तुलातील गोळी डोक्यात झाडून घेऊन आत्महत्या (crimecase) केली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. माळी यांनी डोक्याच्या उजव्या बाजूला गोळी झाडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हुपरी पोलिस (hupari police) ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह फॉरेन्सिक लॅब तसेच ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अमोल माळी यांनी आजारास कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

उद्योजक अमोल माळी स्वसंरक्षणार्थ परवाना प्राप्त पिस्तुल बाळगत होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्याच पिस्तुलातील गोळी डोक्यात झाडून आयुष्य संपवले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या दीड महिन्यात पिस्तूलातील गोळीने चांदी उद्योजकाचा (silver sale businessman) बळी जाण्याची ही दुसरी घटना आहे. या धक्कादायक घटनेने चंदेरी नगरी हादरून गेली आहे.

कोल्हापूर - हुपरीतील बड्या चांदी उद्योजकाची गोळी झाडून आत्महत्या
बाजारात आवक झाली कमी; कोथिंबीर, पालेभाज्यांचे दर वाढले

अमोल माळी हे शहरातील बडे चांदी उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चांदी रिफायनरी बरोबरच चांदीची साखळी निर्मितीचाही उद्योग आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचारानंतर ते दोनच दिवसांपूर्वी घरी परतले होते. शहरातील लायन्स क्लब तसेच विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांशी त्यांचा चांगला संबंध होता. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.