चोरट्याकडेच मिळाल्या 23 दुचाकी; कारवाईत एकाला अटक

चोरट्याकडेच मिळाल्या 23 दुचाकी; कारवाईत एकाला अटक
Updated on
Summary

गॅरेज चालवणारा हा तरुण अल्पवयीन अन्य दोघांच्या मदतीने चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले.

इचलकरंजी : दुचाकी चोरून त्यांची बाहेरगावी विक्री करणाऱ्या तरुणाला गावभाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ८ लाख ९० हजारांच्या चोरीच्या २३ दुचाकी जप्त केल्या. (ichalkaranji crime case) सिद्धेश्‍वर सुभाष साळगावकर (वय १९, यशवंत कॉलनी रा. कबनूर) असे त्याचे नाव आहे. गॅरेज चालवणारा हा तरुण अल्पवयीन अन्य दोघांच्या मदतीने चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले. (police action) दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी सांगितले. कारवाईत अन्य दोन ठाण्याकडील चोरीच्या ११ दुचाकी जप्त केल्या. अलीकडच्या काळातील जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले. (crime news)

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, दुचाकी चोरीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली होती. गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ दुचाकी चोरीच्या तपासासाठी पथक गस्त घालत होते. एका मध्यरात्री नारायण मळा परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या सिद्धेश्‍वर साळगावकर याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने त्याने चार बुलेट, चार यामाहा, केटीएम यासह ९ लाख रुपये किंमतीच्या २३ दुचाकी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेश्‍वर याच्या वडिलांचाही गॅरेज व्यवसाय आहे. यशवंत कॉलनी परिसरातील त्याच्या गॅरेजमधील २३ दुचाकी जप्त केल्या आहेत.

चोरट्याकडेच मिळाल्या 23 दुचाकी; कारवाईत एकाला अटक
'आजच्या शिवसैनिकांची मला कीव येते, त्यांच्यात हिंमतच नाही'

दुचाकीचे पार्ट काढून व बाहेरगावी दुचाकी विकण्याच्या उद्देशाने सिद्धेश्‍वर चोरी करत असल्याचे तपासात पुढे आल्याचे ताशिलदार यांनी सांगितले. सोमवारी केलेल्या कारवाईत गावभाग पोलिस ठाण्याकडील २, शिवाजीनगरकडील १० आणि हातकणंगले ठाण्याकडील १ असे १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. साळगावकर याला मदत करणाऱ्यांना अल्पवयीन दोघांनाही ताब्यात घेतले आहे. कारवाईत उपनिरीक्षक सोमनाथ कुडवे, सचिन मगदुम, संतोष कांबळे, अमर कदम, नितीन ढोले, विक्रम शिंदे, अमित कदम, राम पाटील, जावेद देसाई सहभागी झाले होते.

दुचाकीची खोटी कागदपत्रे

सिद्धेश्वर दुचाकी खोटी कागदपत्रे करून विक्री करत असल्याची माहिती तपासात पुढे आली. दुचाकी विक्री करताना सुरुवातीला खोटी कागदपत्रे द्यायची एकदा दुचाकी विकली की कागदपत्रे काही दिवसांनी देतो, असेच सिद्धेश्वर सांगत होता. अशा पद्धतीने सिद्धेश्वर याने चोरीच्या दुचाकी बाहेरगावी विक्री केल्याच्या संशयातून गावभाग पोलिस तपास करत आहेत.

चोरट्याकडेच मिळाल्या 23 दुचाकी; कारवाईत एकाला अटक
थेट शिवसेना आमदाराला 'NCP'ची ऑफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.