Kolhapur - बेकरी व्यवसायकाला तब्बल २० लाखांचा गंडा, नफा मिळवून देण्याचं अमिष

यामध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देतो’ असे सांगून विश्वास संपादन केला
crime news in kolhpaur fraud with bekari owner
crime news in kolhpaur fraud with bekari owneresakal
Updated on
Summary

यामध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला

कोल्हापूर - गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याच्या अमिषाने बेकरी व्यवसायाला वीस लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात मलेशियातील महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला. रिका लिम असे त्या संशयित महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की उदय माळी हे बेकरी व्यवसायिक आहेत. त्यांच्या मोबाईलवर संशयित रिका लिम या महिलेने सहा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस् ॲप संदेश टाकले. तिने ‘आपण मलेशियात राहत असून सिंगापूर येथे मुख्य शाखा असलेली जागतिक दर्जाची एक मार्केटींग कंपनी आहे. या कंपनीत आपण भारत आणि मलेशिया या दोन देशासाठी सल्लागार अधिकारी म्हणून काम करते.

crime news in kolhpaur fraud with bekari owner
Justice Uday Lalit : भारताचे भावी सरन्यायाधीश आहेत सिंधुदुर्गचे सुपुत्र

येथे डायमंड आणि प्लॅस्टिक संबधीचे शेअर्स आणि प्लॉट खरेदीचा व्यवहार केला जातो. यामध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देतो’ असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर माळी यांना एक वेबसाईट पाठवली. त्यावर खाते उघडू शकता. त्यावर तुम्ही व्यवहार केले तर तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देतो असेही तिने सांगितले. त्यानुसार माळी यांनी त्या वेबसाईटवर खाते उघडले आणि गुंतवणुकीचे व्यवहारही सुरू केले.

सुरवातीला माळी यांनी ५० हजारांची गुंतवणूक केली. त्या रक्कमेत त्यांना वाढ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संशयित रिका लिम हिने दिलेल्या थिरीसूर, कोईबतोर, रांची, कोलकत्ता, उत्तर प्रदेश अशा वेगेवेगळ्या बँक खात्यावर २० लाख दोन हजार रूपयांची गुंतवणूक केली. त्यांना ही रक्कम ४० लाख ४४ हजार ३०० रूपयांपर्यंत वाढल्याचे लक्षात आले. त्यांनी २५ मे रोजी संशयित रिका लिम यांना पैशाची गरज आहे.

पैसे काढणार आहे असे सांगितले. पण तिने त्यांना यावर बोनस मिळणार आहे. तुम्ही पैसे काढू नका असे त्यांना सांगितले. त्यामुळे माळी यांनी ही रक्कम काढली नाही. मात्र ३० मे रोजी त्यांना पैशाची अत्यंत गरज होती. त्यांनी पैसे काढण्यासाठी वेबसाईट सुरू केली. पण ती बंद असून रिका लिमचा संपर्क होत नसून आपली फसवणूक झाली. हा प्रकार २२ मार्च ते ७ जून अखेर घडल्याची फिर्याद माळी यांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

crime news in kolhpaur fraud with bekari owner
Politics : 'सेनेचे 12 खासदार शिंदे गटासोबत गेले असले तरी मी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.