Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal

Kolhapur Crime : हातगाडी लावण्यावरून कोल्हापुरात एकाला भोसकलं; इम्रानवर चाकूने सपासप वार

Kolhapur Ganesh Visarjan : एकीकडे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच दुसरीकडे खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
Published on
Summary

संशयित आरोपी युसूफ अलमसजीत (दाजी) याला राजवाडा पोलिसांनी (Rajwada Police) ताब्यात घेतले असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.

कोल्हापूर : गणपती विसर्जन मिरवणूक (Kolhapur Ganesh Visarjan) सुरू असतानाच कोल्हापुरात एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हातगाडी लावण्यावरून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कोल्हापूरच्या आराम कॉर्नरजवळ ही घटना घडलीये. इम्रान इमाम मुजावर (वय 32 रा. आराम कॉर्नर, शिवाजी रोड) असे मयत तरुणाचे नाव आहे.

Kolhapur Crime
महाराष्ट्रात चाललंय तरी काय? दोन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलानं खोलीत नेलं अन्..

एकीकडे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच दुसरीकडे खून झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित आरोपी युसूफ अलमसजीत (दाजी) याला राजवाडा पोलिसांनी (Rajwada Police) ताब्यात घेतले असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.