Dajipur Sanctuary : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दाजीपूर अभयारण्य 'या' दिवशी राहणार बंद, काय आहे कारण?

मद्यपी पर्यटकांकडून आग लागण्याचे प्रकार घडल्यास जंगलाचे व वन्य जीवांचे नुकसान होऊ शकते.
Dajipur Sanctuary
Dajipur Sanctuaryesakal
Updated on
Summary

वर्षाखेरीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर जेवणाच्या आणि ओल्या पार्ट्या करताना दिसून येतात.

राशिवडे बुद्रुक : पर्यटकांची हुल्लडबाजी आणि अभयारण्याच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दाजीपूर अभयारण्य ३० (Dajipur Sanctuary) आणि ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी (Tourists) बंद राहणार आहे. अशाप्रकारच्या सूचना वन्य विभागाने (Forest Department) परिस्थितीकी विकास समिती आणि पर्यटनाशी संबंधित असलेल्या सर्वांना दिल्या आहेत.

वर्षाखेरीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर जेवणाच्या आणि ओल्या पार्ट्या करताना दिसून येतात. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे काचा आणि प्लास्टिकचा कचरा होतोच, शिवाय सुकलेल्या गवताला आगी लागण्याची शक्यताही अधिक प्रमाणात असते.

Dajipur Sanctuary
Chandoli Dam : चांदोली धरणातून विसर्ग झाल्यानंतर पाण्यात नेमकं काय मिसळलं? पाण्याचे नमुने घेत चौकशी सुरू

मद्यपी पर्यटकांकडून आग लागण्याचे प्रकार घडल्यास जंगलाचे व वन्य जीवांचे नुकसान होऊ शकते. शिवाय काचांमुळे वन्यप्राण्यांना नाहक त्रास होतो. दाजीपूर परिसरातील हसणे ते दाजीपूरपर्यंतच्या सहा किलोमीटरमध्ये राधानगरी तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने पर्यटक जेवणाच्या पार्ट्या करीत असतात. शिवाय कारिवडे, राऊतवाडी परिसरातही पर्यटक आवर्जून येतात. येथे हुल्लडबाजीमुळे ध्वनिप्रदूषण होऊ शकते.

Dajipur Sanctuary
Winter Season : रेल्वे, विमानांचं वेळापत्रक कोलमडलं; दाट धुक्यामुळं अनेक गाड्या रद्द

याचा विचार करून पर्यटकांसाठी ३० व ३१ डिसेंबर रोजी दाजीपूर अभयारण्यात प्रवेशबंदी केली आहे. या काळात पर्यटक आढळल्यास त्यांच्यावर वन्यजीव विभागाच्या वतीने कडक व कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस पर्यटकांसाठी दाजीपूर बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.