बेडगमध्ये आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडली, त्यामुळं दलित-अल्पसंख्याकांवर अन्याय सुरु; कवाडेंचा आरोप

मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेली स्वागत कमान पाडण्यात आली.
Peoples Republican Party Leader Jogendra Kawade
Peoples Republican Party Leader Jogendra Kawadeesakal
Updated on
Summary

‘कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे एका दलित कुटुंबाचे (Dalit Family) घर पाडण्यात आले.'

कोल्हापूर : ‘राज्यात दलित आणि अल्पसंख्याकांवर अन्याय वाढत आहेत. जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे करणार आहोत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील दोन आणि विधानसभेच्या १५ जागा मिळाव्यात, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

प्रा. कवाडे (Prof. Jogendra Kawade) म्हणाले, ‘कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे एका दलित कुटुंबाचे (Dalit Family) घर पाडण्यात आले. मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेली स्वागत कमान पाडण्यात आली. त्यामुळे राज्यात दलित आणि अल्पसंख्याकांवर अन्याय सुरू असून समाजामध्ये जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

Peoples Republican Party Leader Jogendra Kawade
...अन् मनोहर जोशींनी स्थापन केले 'कृष्णा खोरे'; 'या' पाच अपक्ष आमदारांना दिलेला शब्द केला खरा

सरकारी गायरान जमिनी मागासवर्गीय भूमिहिनांना वाटप करावी.' पत्रकार परिषदेला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, जिल्हा सरचिटणीस विद्याधर कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष लताताई नागावकर आदी उपस्थित होते.

Peoples Republican Party Leader Jogendra Kawade
उमेदवारी मिळाली तर आनंदच, पण अजून ऑफर नाही; लोकसभा निवडणुकीबाबत शाहू छत्रपती महाराजांचं सूचक विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.