जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टर शेती पाण्याखाली होती. ज्या-ज्या ठिकाणांचा पूर ओसरला आहे त्या-त्या ठिकाणांचे पंचनामे गतीने केले जात आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराने ३२ हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली. पंचगंगा, भोगावती, दूधगंगा (काळम्मावाडी), कुंभी, कासारीसह सर्वच नद्यांना आलेल्या पुराच्या (Kolhapur Flood) पाण्यात पंधरा दिवसांहून अधिक काळ राहिलेल्या पिकांनी दम तोडला आहे. आतापर्यंत आठ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पूर ओसरेल तसे कुजलेल्या पिकांचे भयाण चित्र शेतकऱ्यांचे काळीज पिळवटून टाकणारे आहे.