14 ऑगस्ट रोजी ते दोघे बेपत्ता झाल्याची नोंद जंगली महाराज मठातून व त्यांच्या नातेवाइकांकडून कागल पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
शाहूवाडी : आंबा (ता. शाहूवाडी) येथील खोल दरीत (Amba Ghat) सुमारे अडीचशे ते तीनशे फुटांवर काल दोन तरुणांचे मृतदेह आढळले. सौरभ दिनकर माने (वय २५, रा. कवठेपिरान, जि. सांगली) व प्रशांत श्रीरंग सातवेकर (१९, रा. निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दुपारपासून मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरू होती; मात्र जोरदार पाऊस व दाट धुक्यामुळे मोहीम थांबवण्यात आली.