धक्कादायक! कळंब्यात गटारीत आढळले सात महिन्यांचे स्त्री जातीचे मृत अर्भक; परिसरात खळबळ, पोलिसांनी सांगितलं..

एका कापडामध्ये अर्भक गुंडाळलेले होते.
Female Infant
Female Infantesakal
Updated on
Summary

कळंबा येथील कात्यायनी कॉम्प्लेक्सच्या बोळातील गटातील एक अर्भक असल्याचे सकाळी दिसून आले.

कळंबा (कोल्हापूर) : साधारण सहा ते सात महिन्यांचे स्त्री जातीचे मृत अर्भक येथील गटारीमध्ये आढळून आले. अज्ञाताने रात्री हे अर्भक टाकल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

काल (बुधवार) सकाळी स्थानिक नागरिकांना हे अर्भक दिसताच त्यांनी याची माहिती करवीर पोलिसांना (Karveer Police) दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

Female Infant
Kolhapur : 'मराठ्यांशी दुश्मनी करणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या छाताडावर नाचू'; मराठा संघटना-जिल्हाधिकाऱ्यांत जोरदार खडाजंगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा येथील कात्यायनी कॉम्प्लेक्सच्या बोळातील गटारीत एक अर्भक असल्याचे आज सकाळी दिसून आले. त्यानंतर स्थानिक असलेले प्रशांत जवळीमठ यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक निवास पोवार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तेंव्हा एका कापडामध्ये ते गुंडाळलेले होते.

Female Infant
Ichalkaranji Crime : दुसऱ्या पुरुषाशी बोलली म्हणून प्रियकरानं कापला प्रेयसीचा चाकूनं गळा; दोघांमध्ये जोरदार भांडण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.