छोटी मुलगी अवनी बाजूला ठेवलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्यामुळे तिचे संपूर्ण शरीर भाजले. ती जास्त भाजली असल्याने तिला कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले होते.
पट्टणकोडोली : खेळता खेळता उकळलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या येथील चिमुकलीचा उपचारादरम्यान (Treatment) मृत्यू झाला. अवनी नंदकुमार बोरगावे (वय २) असे तिचे नाव आहे.