आत्महत्येच्या घटनेनंतर पतीने फोनवरून माहेरला कळविले. यावेळी संतप्त नातेवाइकांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पती, सासू, नणंद यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला.
पेठवडगाव : अवघ्या सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या गर्भवती महिलेने (Pregnant Women) सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भादोले (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (ता. १७) सायंकाळी घडली. अनुराधा ऋषिकेश मदने (वय २०) असे विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी पती ऋषिकेश बाजीराव मदने (वय २२, रा. भादोले), सासू शोभा बाजीराव मदने (वय ४५), नणंद पूनम संपत जाधव (वय ३२, रा. वाठार तर्फ वडगाव) यांच्याविरोधात गुन्हा (Vadgaon Police Station) दाखल झाला आहे. फिर्यादित म्हटले आहे, भादोले (ता. हातकणंगले) येथील ऋषिकेश मदने व अनुराधा यांचा १४ एप्रिल २०२४ ला विवाह झाला. विवाह झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पती त्रास देऊ लागला.
दागिने दिले नाही असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करत होता. यावेळी सासरच्यांनी त्याला चांदीचे ब्रेसलेट करून दिले. तरीसुद्धा तिला त्रास सुरूच होता. याबाबत तिने आपल्या माहेरी कळवल्यानंतर तिला माहेरी (मतकुणकी, ता. तासगाव, जि. सांगली) घेऊन गेले. यानंतर सासरच्या लोकांनी मध्यस्थीनंतर त्रास देत नाही, असे कबूल करून तिला पुन्हा भादोले गावी आणले; परंतु त्यानंतर पुन्हा नवी मोटारसायकल घेण्यासाठी दीड लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून मारहाण व छळ सुरू केला.
वारंवार होणाऱ्या मारहाणीस कंटाळून तिने राहत्या घरी मंगळवारी (ता.१७) सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येच्या घटनेनंतर पतीने फोनवरून माहेरला कळविले. यावेळी संतप्त नातेवाइकांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पती, सासू, नणंद यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी भादोले येथे मृतदेहावर अत्यसंस्कार केले. संबंधित तिघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. याबाबतची फिर्याद मुलीचे वडील परसराम यलमार (रा. मतकुणकी) यांनी दिली. या घटनेची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून, तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.