रूपाली यांचा नऊ वर्षांपूर्वी संग्रामशी विवाह झाला. विवाहानंतर कोल्हापुरात साने गुरुजी वसाहतीमधील गजलक्ष्मी पार्क येथे राहायला आले.
कळे : गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) दिवशी आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथे माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरी दिवशी परत येतो असा निरोप आई व भावाला देऊन सासरी गेलेल्या रूपाली या माहेरवाशीण आज परतल्याच नाहीत. त्यांना अचानक तीव्र अशक्तपणा आला अन् मृत्यूनेच गाठले.