कोल्हापूर : निर्बंध पाळूनच जोतिबाचे खेटे; राहुल रेखावार

जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून घेतला आढावा
deccan king jyotiba tempal kolhapur khete corona restrictions Rahul Rekhawar
deccan king jyotiba tempal kolhapur khete corona restrictions Rahul Rekhawarsakal
Updated on

जोतिबा डोंगर : येत्या रविवारपासून सुरू होणारे जोतिबाचे खेटे कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. खेट्याच्या पार्श्‍वभूमीवर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, बैठकीत ई पास दर्शन पद्धत बंद करणे, मुलांना प्रवेश देणे तसेच मंदिर परिसरातील चारी दरवाजे खुले करणे या विषयावर ग्रामस्थ पुजाऱ्यांनी बैठकीत जोरदार चर्चा केली.

ते म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त भाविकांना जोतिबाचे दर्शन घडवून आणता येईल यासाठी सर्वांनी सुरक्षित राहून सोहळा आनंदात पार पाडू या. शासनाकडे निर्बंध कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे डोंगरावर जास्तीत जास्त भाविकांना येता येईल.’’सरपंच राधाबाई बुणे, नवनाथ लादे, गोरख बुणे, सुनील नवाळे, तुषार झुगर यांनी ई पास, मुलांना प्रवेश बंद यामुळे होणारे भाविकांचे हाल याविषयी मते मांडली.

देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी व्यवस्थेविषयी माहिती सांगितली. पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, पोलिस उपअधीक्षक रवींद्र साळुंखे, सचिव शिवराज नायकवडी, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, अधीक्षक दीपक म्हेत्तर दहा गावकर ग्रामस्थ पुजारी तसेच अधिकारी उपस्थित होते.

‘सकाळ’च्या वृत्ताची चर्चा

‘सकाळ’मध्ये सोमवारी (ता. १४) लेकरं मंदिराबाहेर या विषयावर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची बैठकीत चर्चा झाली. ग्रामस्थ पुजाऱ्यांनी मुलांना मंदिरात प्रवेश तात्काळ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.