गडहिंग्लज - लष्करात भरती होणे, हेच आजही ग्रामीण भागातील बहुसंख्य युवकांचे स्वप्न आहे. पण, कोरोनाने या स्वप्नालाच सुरूंग लावल्याने युवक अस्वस्थ आहेत. भरती ठप्प होण्यासह दोन वर्षांत वय वाढल्याने हजारो युवक अपात्र ठरणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (एमपीएससी) धर्तीवर किमान दोन वर्षे अधिक सवलतीची युवकांची मागणी आहे. संरक्षण मंत्रालयाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील खासदारांनी याबाबत पाठपुरावा करावा, असा भरती इच्छुक युवकांचा आग्रह आहे.
ग्रामीण भागात मैदानांची वानवा असतानाही शेकडो युवक जीव धोक्यात घालून सकाळी व सायंकाळी रस्त्यावर धावण्याचा सराव करतात. लष्करात भरती होण्यासाठीच त्यांची ही कसरत सुरू असते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे भरती प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे भरती इच्छुक युवक अस्वस्थ आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्याने आता सर्वांनाच भरती प्रक्रियेची आस लागून राहिली आहे. परंतु, पावसाळा तोंडावर आल्याने ही प्रक्रिया किमान तीन महिने पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत.
वयात सवलत मिळेल
भरती न झाल्याने इच्छुक युवकांचे वय वाढत चालले आहे. पात्र युवकांचे वय दोन वर्षांनी वाढल्याने हजारो युवक अपात्र ठरणार आहेत. सध्या जीडीसाठी २१, तर टेक्निकलसाठी २३ ही वयोमर्यादा आहे. त्यामुळे कोरोनातील वाया गेलेली दोन वर्षे लक्षात घेता जीडीसाठी २३, तर टेक्निकलसाठी २५ वयोमर्यादा करण्याची युवकांची मागणी आहे. ‘एमपीएससी’ने खुल्या गटासाठी एक वर्षाने वयोमर्यादा वाढवून दिली, त्याच धर्तीवर लष्कर भरतीसाठी सवलत द्यावी, असे भरती इच्छुक युवकांचे मत आहे. भरती प्रक्रियेचे नियंत्रण संरक्षण मंत्रालयाकडे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.