‘डेंगी’च्या निमित्ताने राजकीय धूर; विरोधक आक्रमक, सत्तारूढ रस्त्यावर

शहरात डेंगी रुग्णांचा आढळ झाल्याने विरोधक आक्रमक झाले असून सत्तारूढ पदाधिकारीही रस्त्यावर
‘डेंगी’च्या निमित्ताने राजकीय धूर; विरोधक आक्रमक, सत्तारूढ रस्त्यावर
Updated on

गडहिंग्लज : येत्या डिसेंबरमध्ये पालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत संपत आहे. कोरोनामुळे निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रमावस्था आहे; परंतु सत्तारूढ जनता दल आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या ना कोणत्या निमित्ताने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या समोरासमोर उभे ठाकत आहेत. कधी सोशल मीडियातून, तर कधी प्रत्यक्ष कृतीतून हे चित्र पाहायला मिळत आहे. आता शहरात डेंगी रुग्णांचा आढळ झाल्याने विरोधक आक्रमक झाले असून सत्तारूढ पदाधिकारीही रस्त्यावर उतरले आहेत.

डेंगीचा संसर्ग वाढण्यापूर्वीच रोखण्यासाठी विरोधी राष्ट्रवादी आणि सत्तारूढ जनता दल आपापल्या परीने मोहीम राबवित आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने सुरू झालेल्या या विधायक स्पर्धेचे कौतुक करावेच लागेल. एका बाजूला ही विधायक मोहीम सुरू असली तरी त्यामागचे राजकारण लपू शकत नाही, हे सुद्धा तितकेच खरे आहे. शहरातील अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे डेंगीचे रुग्ण आढळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने पक्षातर्फे औषध फवारणी मोहिमेचा प्रारंभ केला. दुसरीकडे, या आरोपांकडे कानाडोळा करत पालिका कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सत्तारूढ पदाधिकारीही डेंगी प्रतिबंधाच्या उपाययोजनेत उतरले आहेत.

‘डेंगी’च्या निमित्ताने राजकीय धूर; विरोधक आक्रमक, सत्तारूढ रस्त्यावर
सरकारी रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना म्युकरचे इंजेक्‍शन मोफत

ईर्षेने आणि प्रत्यक्ष कृतीतून होणारी ही मोहीम नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिलासादायक आहे.गेल्या महिन्यातच कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यावरून जनता दल व राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमने-सामने आले होते. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्षांतील खुन्नस बाहेर पडत आहे, हे मात्र नक्की. तसे हे दोन्ही पक्ष पारंपरिक विरोधकच आहेत. मध्यंतरीच्या काही निवडणुकांत झालेला समेट राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने फार काळ टिकलेला नाही. यामुळे दोन्ही पक्षांमधील राजकीय बेदिली कायम राहिली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकमेकांतील विरोधाची तीव्रता हळूहळू वाढत असून त्यासाठी आता फक्त संधी मिळण्याची फुरसत आहे.

"डेंगीचे संक्रमण रोखण्यासाठी पालिका सक्षम असली तरी कामगारांकडून काम करवून घेण्यात सत्तारूढ व प्रशासन कुठे तरी कमी पडत आहेत. राजकारणापेक्षा डेंगीचे संक्रमण रोखणे व नागरिकांच्या आरोग्याला महत्त्व देऊन राष्ट्रवादीने स्वत:हून उपाययोजनेत पुढाकार घेतला आहे."

- हारुण सय्यद, विरोधी पक्षनेते, नगरपालिका

‘डेंगी’च्या निमित्ताने राजकीय धूर; विरोधक आक्रमक, सत्तारूढ रस्त्यावर
ग्रँडफादर ट्री; वडाच्या झाडाचे आयुष्य शेकडो वर्ष असण्याचं कारण माहितीय का?

"औषध, धूर फवारणी ही कर्मचाऱ्यां‍च्या नियमित कामकाजाचा भाग आहे. फवारणी शहरात सुरूच असते. डेंगी रोखण्यासाठीही उपाययोजना सुरूच आहेत. स्वच्छतेत पालिका कुठेच कमी पडलेली नाही. विविध मान्यवरांनीही स्वच्छतेबद्दल पालिकेचे कौतुक केले आहे. यामुळे अस्वच्छता, फवारणी नसल्याच्या राष्ट्रवादीच्या आरोपात तथ्य नाही."

- महेश कोरी, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.