Devendra Fadnavis : 'उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका करताना आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा'; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : ‘लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी चालणार.'
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
Devendra Fadnavis vs Uddhav Thackerayesakal
Updated on
Summary

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमदशहा अब्दालीचे बुजगावणे आहेत, अशी टीका केली होती.

कोल्हापूर : ‘अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी देशात सांस्कृतिक पुनर्उत्थानाला सुरुवात केली. ३७० कलम रद्द केले. राम मंदिर उभारले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्यावर टीका करताना आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा’, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. सिद्धगिरी मठावरील संत समावेश कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमदशहा अब्दालीचे बुजगावणे आहेत, अशी टीका केली होती. याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करून दाखवले. अयोध्येत राम मंदिर उभे राहिले, काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाला. हिंदू म्हणून आमची ओळख पुसण्याचा ५०० वर्षे प्रयत्न झाला. तो आमच्या नेत्यांनी मोडून काढला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाचे सांस्कृतिक पुनर्उत्थान केले आहे. अशा नेत्यांवर टीका करण्याआधी उद्धव ठाकरे यांनी आरशात चेहरा पाहून घ्यावा.’

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
मोठी बातमी! 'मुडा' घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध ED कडून गुन्हा दाखल; पत्नी पार्वतीसह अन्य तिघांचाही समावेश

लाडकी बहीण योजना आणि मराठा आरक्षण याबद्दल ते म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी चालणार. या योजनेसाठी विकास कामांचा निधी, पगार, अन्य योजनांचा निधी यामध्ये कोठेही अडचण येणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणावरून सरकारवर टीका होते; पण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात मराठा समाजातील एक लाख उद्योजक तयार झाले. सारथीच्या माध्यमातून मराठा तरुण, तरुणी शासकीय सेवेत दाखल झाले. वसतिगृहाची सुविधा दिली. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.