नदीजोड प्रकल्पासाठी पाठपुरावा करू : देवेंद्र फडणवीस

चिखली-आंबेवाडी ग्रामस्थांचे ३२ वर्षे रखडलेले पुनर्वसन पूर्ण क्षमतेने करावयास भाग पाडू
नदीजोड प्रकल्पासाठी पाठपुरावा करू : देवेंद्र फडणवीस
Updated on

प्रयाग चिखली : पंधरा वर्षांनंतर येणारी आपत्ती वर्षाला येत आहे. नदीजोड प्रकल्प पुराचे पाणी बोगद्यातून वळवून दुष्काळी भागात नेत नाही, तोपर्यंत हा महापूर येत राहणार. मी मुख्यमंत्री असताना कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी हा प्रस्ताव जागतिक बँकेतून (world bank) मंजूर करून घेतला असून, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडू. तसेच चिखली-आंबेवाडी ग्रामस्थांचे ३२ वर्षे रखडलेले पुनर्वसन पूर्ण क्षमतेने करावयास भाग पाडू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी येथे बोलताना केले.

नदीजोड प्रकल्पासाठी पाठपुरावा करू : देवेंद्र फडणवीस
'पूरसंरक्षणासाठी नदी काठावर भिंत शक्य नाही'

ते म्हणाले, ‘‘२०१९ च्या महापुरात उद्‍ध्वस्त झालेल्या चिखलीकरांना आमच्या सरकारने आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या माध्यमातून भरभरून मदत केली, त्यामुळे पूरग्रस्त सावरला. मात्र, आमच्या काळात मंजूर जाहीर केलेली मदत आघाडी सरकारला (aaghadi sarkar) चिखली, आंबेवाडी पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्याचेही श्रेय घेता आले नाही. पुन्हा एकदा चिखली-आंबेवाडी ग्रामस्थांवर उद्ध्वस्त होण्याची वेळ महापुरामुळे (kolhapur flood) आली आहे.’’

नदीजोड प्रकल्पासाठी पाठपुरावा करू : देवेंद्र फडणवीस
'नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवडीत हस्तक्षेप करणार नाही'

माजी खासदार धनंजय महाडिक यांनी चिखली व आंबेवाडीच्या भौगोलिक स्थितीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, त्याची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत आढावा घेतला. भाजपचे संभाजीराव पाटील, ‘गोकुळ’चे संचालक एस. आर. पाटील, रघुनाथ पाटील यांनी गावातील पूरस्थिती आणि पुनर्वसन याबाबत माहिती दिली. पाडळी बुद्रुक ग्रामस्थांनी गावाला मदत करण्याबरोबरच पुनर्वसन सुरक्षित स्थळी करावे, अशा आशयाचे निवेदन दिले. दरम्यान, फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आंबेवाडीत भेट दिली. सरपंच सिकंदर मुजावर यांनी पुनर्वसनाची प्रमुख मागणी केली. फडणवीस यांनी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सरकारपुढे प्राधान्याने मांडणार असल्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.